आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आलूर येथे सेवालाल महाराज व देवी यात्रेचे आयोजन; कन्नड भाषेतून करण्यात आलेल्या महाआरतीने सर्व भाविकांचे लक्ष वेधले

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील आलूर येथील ज्योतीतांडा येथील बंजारा समाजाचे दैवत संत श्री. सेवालाल महाराज व आई जगदंबा देवी यांच्या यात्रेनिमित्त सोमवारी सकाळी अभिषेक करण्यात आले. बंजारा बोलीभाषेतून व कन्नड भाषेतून सादर करण्यात आलेल्या महाआरती करून सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.

तत्पूर्वीच्या सायंकाळी ज्योतीतांडा येथील ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने मंदिराच्या आवारात येतात व दर्शन घेतात. संत सेवालाल महाराज व आई जगदंबेला साष्टांग दंडवत घालतात नैवेद्य दाखवतात. भजन कीर्तन गाण्यांची जुगलबंदी अशा विविध कार्यक्रमांनी यात्रा उत्सव साजरा केला जातो.

जय सेवालाल नवतरुण मंडळ यांनी यात्रा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. यात्रा महोत्सवात दर्शनासाठी बंजारा समाजातील हजारो भाविकांची गर्दी उसळल्याने ज्योतीतांडा आलूरनगरी भाविकांनी दुमदुमून गेल्याचे चित्र याठिकाणी पाहावयास मिळाले.

यात्रा यशस्वी करण्यासाठी धारू पवार, गुलाब राठोड, घनू पवार, पांडुरंग पवार, संदीप पवार, गोपीनाथ पवार,शंकर चव्हाण,शिवाजी पवार, रोहिदास पवार, चंद्रकांत राठोड, रुपेश राठोड, राजु राठोड, अशोक राठोड, पुजारी शिवाजी पवार, सुभाष पवार मोहन चव्हाण, हरी राठोड, भीमू चव्हाण, सुभाष राठोड, अनिल आडे आदींनी परिश्रम घेतले.अनेक दिवसानंतर झालेल्या उत्सवाचा उत्साह अपूर्व होता.

पारंपरिक वेशभूषा
गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाने पंच कमिटीने ही यात्रा रद्द केली होती. यावर्षी यात्रेनिमित्त इतर ठिकाणी राहणारे सर्व भाविक-भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. ही यात्रा दोन दिवस चालणार आहे. गत दोन वर्षापासून कोरोनाच्या काळात ही यात्रा झालेली नव्हती. सायंकाळी भजन, कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी बंजारा समाजातील महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

बातम्या आणखी आहेत...