आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्ह्यातील विविध क्रीडा प्रकारांच्या एकविध संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक क्रीडा दिन २३ जून रोजी विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
उस्मानाबाद येथील जिजाऊ चौकातून क्रीडा ज्योत घेऊन आर्य समाज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिल्हा कोर्ट मार्गे जिल्ह्यात प्रथमच भव्यदिव्य रॅली काढत रॅलीचा शेवट तुळजाभवानी क्रीडा संकुलात करण्यात आला.
रॅलीत महाराष्ट्र ऑलीम्पिक संघटनेचे लातूर विभागीय संयोजक डॉ चंद्रजीत जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी मीरा रायबान,अर्जुन पुरस्कार प्राप्त सारिका काळे, भोसले हायस्कूलचे प्रशाकीय अधिकारी आदित्य पाटील, छत्रपती राज्य पुरस्कार्थी रोहिणी आवारे, सुप्रिया घाडगे, जिल्हा तलवारबाजी संघटनेचे सचिव राजकुमार सोमवंशी, जिल्हा सायकलिंग संघटनेचे सचिव अभय वाघोलीकर, जिल्हा खो खो संघटनेचे सचिव प्रवीण बागल, यांच्यासह प्रवीण गडदे, योगेश थोरबोले, कुलदीप सावंत, सचिन पाळणे व संजय देशमुख, ज राजेश महाजन, प्रमोद डोंगरे, बालाजी कानडे, अजीम शेख, राम भुतेकर, माउली भुतेकर, राष्ट्रीय खेळाडू गजेंद्र जाधव, अल्लाउद्दीन सय्यद, कैलास लांडगे, कपिल सोनटक्के, डॉ. समीर बावीकर, प्रभाकर काळे, गुणवंत काळे, आदींसह विविध क्रीडा प्रकारांचे खेळाडू, मार्गदर्शक यावेळी उपस्थित होते. रॅलीत सुमारे १००० जणांनी सहभाग नोंदविला होता. अनेक गुणवंत खेळाडूंचा शोध घेण्यासाठी स्थानिक पातळीवर आधुनिक सुविधा उभारणे यासह स्थानिक पातळीवरील मार्गदर्शकांचाही दर्जा उंचावण्यासाठी सर्व संघटनांचा भविष्यात प्रयत्न असणार आहे. सर्वानी एकत्र येऊन क्रीडा क्षेत्रात आधुनिकता आणण्यासह भविष्यात जिल्ह्यातून पदक विजेता ऑलीम्पिअन घडविणे बाबत महाराष्ट्र ऑलीम्पिक संघटनेचे समन्वयक डॉ चंद्रजीत जाधव व जिल्ह्यातील एकविध संघटनेच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न असणार आहेत.
रॅली दरम्यान जिल्हा आर्चरी संघटना आणि जिल्हा तायक्वॉनदो संघटनेच्या वतीने प्रात्यक्षिकांचे सादरीकरण संबंधित खेळाडूंनी केले. तुळजाभवानी क्रीडा संकुलावर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणारे अर्जुन पुरस्कार्थी सारिका काळे, छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार्थी डॉ चंद्रजीत जाधव, अंकुश पाटील, राजकुमार दहिहांडे, राजकुमार सोमवंशी, सुप्रिया गाढवे, रोहिणी आवारे आदींसह एकविध संघटनेचे सचिव आणि विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षकांची आयोजन समितीच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी प्रशिक्षकांना ट्रॅकसूट देऊन सन्मानित करण्यात आले.
विविध संघटना एकवटल्या
जागतिक ऑलिम्पिक दिवसाच्या माध्यमातून आज जिल्ह्यातील विविध एकविध संघटनांनी एकत्र येत हा दिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. आवश्यक सोइ सुविधा नसताना देखील जिल्ह्यातील खेळाडूंची कामगिरी उत्कृष्ठ राहिलेली आहे, यातच अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवसाच्या माध्यमातून जिल्हाभरात अगदी ग्रामीण भागा पर्यंत खेळाचे जाळे वाढविण्याच्या दृष्टीने ग्रामपातळी पर्यंत मोठी चळवळ उभारण्याचा मानस आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.