आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरी गणपतीचा सण साजरा:महालक्ष्मी पूजनात मातेची अलंकार पूजा ; शिवकालीन विशेष अलंकार

तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महालक्ष्मी पूजनानिमित्त रविवारी तुळजाभवानी मातेची विशेष अलंकार पूजा मांडली. मातेला विशेष अलंकार घालण्यात आले. सायंकाळचा अभिषेक पूजेपर्यंत तुळजाभवानी मातेची अलंकार पूजा भाविकांना दर्शनासाठी खुली होती. तुळजापुरातील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक पद्धतीने गौरी गणपतीचा सण साजरा करण्यात आला. सकाळच्या अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी मातेला महावस्त्र अलंकार घालण्यात येऊन धूपारती नंतर अंगारा काढण्यात आला. यावेळी तुळजाभवानी मातेला नंबर एकच्या डब्यातील विशेष अलंकार घालण्यात आले होते. सायंकाळच्या अभिषेक पूजेपर्यंत तुळजाभवानी मातेची विशेष अलंकार पूजा ठेवण्यात आली होती.

शिवकालीन विशेष अलंकार
तुळजाभवानी मातेला वर्षभरात महालक्ष्मी, नागपंचमी, रथसप्तमी, दसरा, दीपावली पाडवा, गुढी पाडवा, संक्रांत आदी हिंदू सणांदिवशी विशेष अलंकार घालण्याची प्रथा आहे. या दिवशी तुळजाभवानी मातेला शिवकालीन विशेष अलंकार घालण्यात येतात.

बातम्या आणखी आहेत...