आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादेत बर्निंग कारचा थरार:भररस्त्यात धावती कार पेटली, परिसरात धुराचे लोट; सुदैवाने आगीत कोणतीही जीवित हानी नाही

उस्मानाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद जिल्हयातील आळणी रोडवर चालत्या कारने पेट घडल्याची घटना घडली आहे. तीव्र उन्हाच्या उष्णतेमुळे अचानक आग लागल्यामुळे कार पूर्णपणे खाक झाली. कारमधील प्रवाशी द्राक्ष खरेदी करण्यासाठी खाली उतरल्यामुळे त्यांना कोणतीही इजा झाली नाही. उस्मानाबाद पालिका फायर ब्रिगेड घटनास्थळी धाव घेत कारला लागलेली आग आटोक्यात आणली.

नेमकी घटना घडली कुठे?

औसा येथून औरंगाबादकडे चार प्रवासी जात होते. आळणी फाटा येथे आल्यानंतर त्यातील दोन पुरूष व दोन महिला द्राक्ष घेण्यासाठी खाली उतरले. तेव्हा कारमधून धुर निघत असल्याचा दिसून आला. लगेच काही वेळातच कारला आग लागली. काही क्षणातच आगीने पूर्ण कारला घेरले. हा प्रकार महामार्ग पोलिसांना समजला. त्यांनी तातडीने उस्मानाबादच्या अग्निशमन दलाला बाेलावले. आग विझवण्यात आली तरी त्यात कारचे पूर्ण नुकसान झाले. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यामध्ये कारच्या वायरिंगमध्ये उष्णतेमुळे स्पार्किंग होऊन आग लागली असल्याचे समोर आले. प्रवाशांचे दैव बलवत्तर होते म्हणूनच ते द्राक्ष घेण्यासाठी खाली उतरले. त्याचवेळी कारने पेट घेतला.

फायर ब्रिडेगच्या मदतीने आगीवर नियंत्रण
उस्मानाबादच्या आळणीमध्ये झालेल्या या घटनेत कारला लागलेली आग विझवण्यासाठी अखेर अग्निशमन दलाची मदत घ्यावी लागली. फायर डिस्टिंग्विशरच्या मदतीने त्यांनी आगीवर आगीवर नियंत्रण मिळवले. हा प्रकार उपस्थितांपैकी एकाने मोबाईल कॅमेरात कैद केला आहे.यावेळी जुन्या महामार्गावरील एका बाजूची वाहतूक काही अंतरापर्यंत बंद करण्यात आली होती

बातम्या आणखी आहेत...