आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरुपतीला जाताना अपघात:टायर पंक्चर झाल्याने बाजूला थांबवली मिनी बस; आयशरने धडक देताच 200 फूटांपर्यंत फेकल्या गेली; 4 जागीच ठार, तिघे गंभीर जखमी

उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सोलापूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. मिनी बस आणि आयशर ट्रकमध्ये 22 आणि 23 जुलैच्या मध्यरात्री हा अपघात घडला. यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमींपैकी 3 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तिरुपती दर्शनासाठी जाताना अपघात
याबाबत सविस्तर वृत्त असे की मिनी ट्रॅव्हल्स बसने नाशिकच्या मालेगाव येथील काही लोक तिरुपती दर्शनासाठी निघाले होते. ते सोलापूर औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरून निघाले होते. याच दरम्यान उस्मानाबादच्या वाशी तालुक्यातील तेरखेडा शिवारात असलेल्या माऊली हॉटेलजवळ रस्त्याच्या कडेला भीषण अपघात घडला.

पंक्चर झाल्याने बाजूला उभी केली होती बस

प्राथमिक माहितीनुसार, MH-41 AU1554 क्रमांकाच्या मिनी ट्रॅव्हल्स बसचे अचानक टायर पंक्चर झाले होते. त्यामुळे वाहन रस्त्याच्या बाजूला उभे करण्यात आले होते. याचवेळी मागून MH-20 EG1517 क्रमांकाचे आयशर ट्रक भरधाव वेगाने आले आणि उभ्या असलेल्या मिनी बसला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की आयशरच्या धडकेने रस्त्यावर उभी असलेली मिनी बस 200 फुटांपर्यंत फेकल्या गेली. सोबतच आयशर सुद्धा उलटून पडली.

मृतांमधील सगळेच मालेगावचे

शरद विठ्ठलराव देवरे, विलास महादू बच्याव, जगदीश चंद्रकांत दरेकर आणि सतीश सूर्यवंशी अशी मृत्यूमुखी पडलेल्या 4 जणांची नावे आहेत. तर संजय बाजीराव सावंत, भरत ज्ञानदेव पगार आणि गोकुळ हिरामण शेवाळे हे तिघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उस्मानाबादच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सगळेच नाशिकच्या मालेगाव येथील रहिवासी आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच येरमाळा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश मुंडे आणिु पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर इतर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. महामार्ग प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. तसेच मृतांना शवविच्छेदनासाठी येरमाळा येथील शासकीय रुग्णालयात पाठवले. या अपघाताचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश मुंढे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...