आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिळालेल्या संधीबाबत समितीच्या प्रमुखांची मते:राष्ट्रीय स्तरावरील खो खो स्पर्धेच्या नियोजनात उस्मानाबाद ठरले सरस

उस्मानाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीयस्तरावरील खो खो च्या स्पर्धा भरवण्यासाठी उस्मानाबादला पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करून राज्यातील विविध समित्यांमध्ये काम करणाऱ्या खो खो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ठ नियोजनावर भर दिला आहे. स्थानिक आयोजकांसह राज्यभरातील या पदाधिकाऱ्यांचा उस्मानाबादच्या नियोजनात सिंहाचा वाटा राहिला आहे. अगदी घरचा कार्यक्रम असल्याप्रमाणे सर्वांनी झोकून देऊन नियोजन केले आहे.

प्रथम राष्ट्रीयस्तरावरील क्रीडा स्पर्धा उस्मानाबादमध्ये पार पडत आहे. प्रत्येक खेळाडूला भोजन, निवास आणि मैदान सरस मिळण्याची अपेक्षा असते. या तीन्ही बाबतीत नियोजनात उस्मानाबाद सरस ठरला आहे. राज्यभरातून येथे आलेल्या पदाधिकाऱ्यांनी येथील नियोजनामध्ये आपले योगदान दिले आहे. प्रत्येकांनी स्वत:हून येथील जबाबदारी स्विकारली आहे. घेतलेली जबाबदारी तंतोतंत पाळण्यासाठी तत्परताही दाखवली आहे. मात्र, ही जबाबदारी पार पाडत असताना उस्मानाबादेत उपलब्ध असलेल्या व्यवस्थेबाबतही कौतुक वाटत आहे.

पहिल्यांदाच खेळाडूंना खोल्या अन्य ठिकाणच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये निवास व्यवस्था करत असताना मोठी दमछाक होते. उस्मानाबादमध्ये निवास व्यवस्था करताना काहीही अडचण आली नाही. येथे लॉजची संख्या मुबलक प्रमाणात आहे. काहींना मंगल कार्यालयातील खोल्या दिल्या. ज्यांचा निवास दूर अाहे, अशांना जीपची व्यवस्था ने आण करण्यासाठी केली. संदिप तावडे, निवास व्यवस्थाप्रमुख.

नियमाचे काटेकोर पालन उस्मानाबादच्या स्पर्धेमध्ये नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. स्पर्धा सुरू होण्याचा कालावधी, संपण्याचा कालावधी, पंचाचे निर्णय अचूक ठरले आहेत. यामुळे पुरस्कार देण्यासाठी सुलभता निर्माण झाली. पुरूष गटासाठी उत्कृष्ठ खेळाडू म्हणून एकलव्य तर महिलासाठी राणी लक्ष्मीबाई पुरस्कार दिला जातो. याची निवड करणे अवघड असते. गोविंद शर्मा, प्रमुख, पुरस्कार समिती.

प्रेक्षकांकडूनही सहकार्य पंच म्हणून काम करत असताना काही वेळा यजमान संघ खेळत असताना प्रेक्षकांची हुल्लडबाजी होत असते. उस्मानाबादमध्ये असे काहीही घडले नाही. अगदी निर्भेळ वातावणात पंच म्हणून निर्णय देत असताना कोणतीही अडचण उद्दभवली नाही. तरीही प्रेक्षकांकडून कोणतीही येथे अडचण आलेली नाही. प्रशांत पाटणकर, प्रमुख, राष्ट्रीय पंच पॅनेल.

वृत्तपत्र, माध्यमांचा प्रतिसाद मी मुंबईला वास्तुविषारद म्हणून काम करतो. आवड म्हणून नियोजनात आहे. प्रसिद्धी देण्याचे काम करत असताना येथील माध्यमे व वृत्तपत्रांचा चांगला प्रतिसाद दिसून आला. त्यांच्या राज्य व राष्ट्रस्तरीय प्रसिद्धीमुळेच प्रेक्षकवर्ग चांगला मिळत आहे. यामुळे खेळाडूंना चांगला प्रतिसाद मिळत आहे. येथे वेगवेगळे प्रयोग करण्यात आले आहेत. बाळ तोरसकर, प्रमुख, प्रसिद्धी समिती.

बातम्या आणखी आहेत...