आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उस्मानाबाद @16:जिल्ह्यात रात्रीतून वाढले 6 नवीन रुग्ण, मुंबई-पुणे रिटर्न नागरिकांतून वाढतोय कोरोनाग्रस्तांचा आकडा

उस्मानाबादएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • 15 दिवसांत पुणे, मुंबई आणि इतर जिल्ह्यातून 1 लाख नागरिक उस्मानाबादेत दाखल

प्रवीण पवार

मोठ्या अथक प्रयत्नातून ग्रीन झोन सांभाळलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात हळुहळु कोरोनाच्या विषाणुने छुप्या मार्गाने प्रवेश सुरू केला आहे. मुंबई-पुणे येथून आलेल्या ७ कोरोनाबाधीतांवर उपचार सुरू असताना नव्याने यामध्ये आणखी ६ जणांची मंगळवारी रात्री भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांचा आकडा १६ इतका झाला असून यातील चौघे उपचाराअंती घरी गेल्याने सध्या १२ अॅक्टीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांच्या कालावधीत परजिल्ह्यातून विशेषता पुणे, मुंबई येथून एका लाखापेक्षा जास्त नागरिक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यामध्ये अधिकृत परवानगी घेऊन तसेच छुप्या मार्गाने दाखल झालेल्या नागरिकांचा समावेश आहे. परंतु, याच नागरीकांबरोबर काेरोनाचाही जिल्ह्यात शिरकाव होताना दिसत आहे. आठवडाभरापूर्वी भूम व कळंब तालुक्यातील मुंबई व पुण्यावरून आलेले असे एकूण ६ जण कोरोनाबाधीत आढळल्याने आरोग्य यंत्रणा कामाला लागलेली असताना मंगळवारी रात्री जिल्ह्यातील नवीन ६ जणांचे स्वॅब रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. यामध्ये उस्मानाबाद, तुळजापूर शहरातील प्रत्येकी एक, जेवळी (ता. लोहारा) येथील १, गिरवली (ता.भूम) १ व खंडेश्वरवाडी (ता. परंडा) येथील २ यांचा समावेश आहे.

या पार्श्वभूमीवर उस्मानाबादेतील पॉझीटीव्ह रुग्ण आढळलेल्या धारासूरमर्दीनी देवीरोड परिसरात सील करण्यात आले आहे. तसेच तुळजापूरात भोसले गल्ली परिसर, भूम तालुक्यातील गिरवली, परंडा तालुक्यातील खंडेश्वरवाडी व जेवळी (ता.लोहारा) या गावांच्या सीमा सील करून तेथे पेशंटच्या संपर्कातील नागरिकांना क्वारंटाईन करून तपासणी व स्वॅब नमुने घेण्यात येत आहेत. मंगळवारी एकूण ४९ जणांचे अहवाल जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहेत. यामध्ये ६ अहवाल पॉझीटीव्ह, ४२ निगेटीव्ह, १ स्वॅब पुन्हा पाठविण्यासाठी सांगितला असल्याचे कळते.

बातम्या आणखी आहेत...