आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑक्सिजन प्रकल्प:धाराशिव कारखान्यातील ऑक्सिजन प्रकल्पाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री ठाकरे यांनी या उपक्रमाबद्दल आणि पथदर्शी प्रकल्पाबद्दल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचे कौतुक केले

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील चोराखली येथील धाराशिव साखर कारखान्यातील ऑक्सिजन प्रकल्पाचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी पार पडले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी या उपक्रमाबद्दल आणि पथदर्शी प्रकल्पाबद्दल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचे कौतुक केले. या प्रकल्पातील ऑक्सिजन वापराला सुरुवात झाली आहे.

देशातील पहिला ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प धाराशिव साखर कारखान्याने उभा करून देशाला दिशा दिली आहे. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व राज्य महामार्ग आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख, धाराशिव कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील घाडगे, जिल्हाधिकारी कौतुभ दिवेगावकर यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी या ऑनलाइन उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...