आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्य यंत्रणा पडतेय:सामाजिक दातृत्व! उस्मानाबादेत शिवसेनेने रुग्णांसाठी उभारले 125 बेडचे कोविड सेंटर

उस्मानाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उस्मानाबाद शहरात शिवसेनेच्या वतीने कोविड सेंटर उभारण्यात आले आहे.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शिवसेनेच्या माध्यमातून उस्मानाबाद शहरातील राजे कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे असलेल्या समर्थ मंगल कार्यालयात जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्यासह आयएमए आदींच्या प्रयत्नातून हे कोविड सेंटर उभारण्यात आले असून, १२५ बेडच्या कोविड सेंटरमध्ये ५० बेडे ऑक्सिजनचे असणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या सेंटरला परवानगी दिली असून, ऑक्सिजन लाइनचे काम पूर्ण होताच दोन दिवसांत सेंटर सुरू होईल. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. उस्मानाबादेत रुग्णांसाठी खासगी तसेच सरकारी रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत. या पार्श्वभूमीवर कोविड सेंटरची मोठी गरज होती. त्यामुळेच शिवसेनेने पुढाकार घेऊन जम्बो कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मतदारसंघातील रुग्णांच्या सेवेसाठी अधिक बेड उपलब्ध व्हावेत, म्हणून कोरोनाबाधित रुग्णांसाठी शिवसेना, पवनराजे फाउंडेशन, नगरपालिका व आएमएच्या संयुक्त विद्यमाने समर्थ मंगल कार्यालयात १२५ बेडचे कोविड सेंटर सुरू उभारले आहे. त्यापैकी ५० बेड हे ऑक्सिजनचे असतील. उत्तम आरोग्य व्यवस्था, तज्ज्ञ डॉक्टर्स आदी सुविधा येथे उपलब्ध होणार आहेत. रुग्णांना योग्य उपचार देणे व कोरोनाचा फैलाव थांबवणे आपले प्रथम कर्तव्य आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले आहे.

तरुणांच्या पुढाकारातून उमरग्यात ६० बेडचे कोविड सेंटर
शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने सामाजिक भावनेतून आरोग्य विभाग आणि प्रशासनाच्या मदतीसाठी स्वखर्चातून माऊली प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमाकांत माने यांनी युवकांच्या सहकार्यातून शहरातील आईसाहेब मंगल कार्यालयात ६० बेडचे अद्ययावत कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. माउली प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमाकांत माने व पदाधिकारी युवकांच्या माध्यमातून मुगळे हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या शहरातील सुसज्ज अाणि अद्ययावत आईसाहेब मंगल कार्यालयात स्वखर्चाने सुविधायुक्त ६० बेडचे कोविड केअर सेंटर उभारले असून, दोन दिवसापूर्वी कोविड सेंटरची उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक बडे यांनी पाहणी करून कोविड सेंटरला परवानगी देण्याचा प्रस्ताव तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला होता. या कोविड केअर सेंटरला शुक्रवारी (दि. २३) जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली असून, रविवारपासून आईसाहेब मंगल कार्यालय येथील कोविड केअर सेंटर रुग्णाच्या सेवेत असणार आहे. यासाठी विजय जाधव, सिद्धेश्वर माने, आकाश चव्हाण, राहुल सुरवसे, धर्मराज जाधव, स्वप्निल सोनकवडे, विष्णू पांगे, प्रसन्ना पुदाले, राम अटुरे, मितेश राखेलकर, सिध्दू दुधभाते, विष्णू बिराजदार, सतीश जाधव आदीसह सदस्य व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे.

आमदार राणा पाटील मोठ्या गावांमध्ये देणार १००० बेड
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून ग्रामीण भागात एक हजार बेड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी प्रशासनाकडे किमान २० बेडचा प्रस्ताव गावांनी पाठवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.शनिवारी आमदार पाटील यांनी जिल्हयातील कोव्हीड परिस्थीतीचा सर्वंकष आढावा घेतला आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे तसेच महसूल विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत पाटील यांनी चर्चा केली. कोविड केअर सेंटरच्या एकूण ३२७२ बेडपैकी १९४६ बेड शिल्लक आहेत. ऑक्सिजन बेड ७५० पैकी ४६ बेड शिल्लक आहेत तर आयसीयूच्या २१५ बेड पैकी केवळ ८ बेड शिल्लक आहेत.

तेरणा ट्रस्ट संलग्न सीसीसीमध्ये २९५ बेडपैकी केवळ ६८ बेड वापरात आहेत. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या वाढत आहे. ५६९० ॲक्टिव्ह रुग्णांपैकी केवळ २६२८ रुग्ण रुग्णालयात, सीसीसीमध्ये दाखल होऊन उपचार घेत आहेत. उर्वरित ३०६२ रुग्णांना अलगीकरण मध्ये राहणे बंधनकारक आहे. परंतु, हे बंधन अनेक ठिकाणी पाळले जात नाही. यामुळे दहा हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील गावांनी सेंटरचा विचार करण्याचे आवाहन आहे.

खासदार ओमराजे, आमदार कैलास पाटील यांचा पुढाकार, आयएमए, नगरपालिकेचेही योगदान
त्यापैकी ५० बेड हे ऑक्सिजनचे असतील. उत्तम आरोग्य व्यवस्था, तज्ज्ञ डॉक्टर्स आदी सुविधा येथे उपलब्ध होणार आहेत. रुग्णांना योग्य उपचार देणे व कोरोनाचा फैलाव थांबवणे आपले प्रथम कर्तव्य आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले आहे. दरम्यान,शनिवारी दुपारी या कोविड सेंटरला खासदार ओमराजे, अामदार कैलास पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे आदींनी भेट देऊन पाहणी केली. या जम्बो कोविड सेंटरमध्ये शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...