आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:उस्मानाबाद जि. प.मध्ये बसवेश्वर जयंती; परंडा व शिराढोण येथेही महात्मा बसवेश्वरांना अभिवादन

उस्मानाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद जिल्हा परिषद येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ प्रशासनाधिकारी पी. के. कांबळे आणि सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ भांडार विभाग प्रमुख मधुकर कांबळे यांनी महात्मा बसेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.यावेळी किरण आगाशे,विनायक मेटकरी, डी. एन. देशपांडे, रवी टेंगरे, एन. बी. झरकर आणि कांबळे हजर होते.

परंड्यात जयंती
परंडा शहरात महात्मा बसवेश्वर यांची ८९० वी जयंती राजपूत गल्ली मधू लोखंडे यांच्या निवासस्थानी साजरी करण्यात आली. या वेळी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन मधू लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दशरथ ठोंबरे, मयूर लोखंडे, समर्थ कुळधर्मे, अनंत लोखंडे, धीरज ठाकुर, शांतलिंग शहापुरे, ओंकार तबीलदार संजय तुपवाले, वैभव मस्के, वेदांत लोखंडे, भैय्या सरक, संजय कानडे आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

शिराढोण येथे जयंती
शिराढोण (ता. कळंब) येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी चौकात मूर्तिपूजन करून जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमा साठी सहायक पोलिस निरीक्षक वैभव नेटके, श्रीपाद कापसे, अविनाश कापसे, भरत कापसे, कांचनताई संगवे, राजेश्वर बाप्पा पाटिल, पद्माकर पाटिल नितीन पाटिल माकोडे सर, दिलीप भाऊ कापसे, श्रीकांत कापसे, सूरज कुंभार, दयानंद राऊत, मनोज राऊत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...