आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. मांजरा प्रकल्पातील 18 दरवाजे उघडण्यात आल्यामुळे जवळच असलेल्या वाकडी (शि) भागत पाणी शिरल्याने 17 जण अडकले आहेत. येथे बचाव कार्य सुरू आहे.
गेल्या आठवड्यापासुन पावसाने हाहाकार माजवला आहे. धरण, नद्या व साठवण तलाव भरुन वाहत आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 28 सप्टेंबरच्या मध्यरात्री जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे मांजरा प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यामुळे धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले. प्रतिसेकंद 1.27 क्यूसेक वेगाने विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. यामुळे वाकडी (शि) येथील परिसरात पाणी शिरले आणि काही वेळात परिसर पाण्याखाली गेला.
शेतातच राहणारे प्रसाद सोमासे, उध्दव शिंदे, रामराव शिंदे यांच्या घराला पाण्याने वेढा घातला आहे. तब्बल तीन कुटुंबातील 17 लोक आणि जनावरे येथे अडकली आहेत. याविषयी माहिती कळताच तहसीलदार विद्या शिंदे, शिराढोणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नेटके व महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.
गोताखोर पाठवुन हे कुटुंब काढता येईल का पाहिले मात्र पाण्याने विळखा वाढलेला असल्यामुळे हे शक्य नाही. यामुळे त्यांना काढण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात NDRF ची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. त्यांनी बचाव कार्य सुरू केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.