आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजीराजे अवमान प्रकरण:तुळजापूरच्या तहसीलदार व तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्थापकांना कारणे दाखवा नोटीस

उस्मानाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर मंदिरात छत्रपती संभाजीराजे यांना प्रवेश नाकारल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात उपजिल्हाधिकाऱ्यांकडून तहसीलदार योगिता कोल्हे आणि धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. गुरूवारी या प्रकरणी तुळजापूरच्या व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळला होता, यानंतर त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रात नेमके काय?
सौदागर तांदळे यांनी दिलेल्या पत्राचा हवाला देत उपजिल्हाधिकारी यांनी तहसीलदार व धार्मिक व्यवस्थापकांना या प्रकरणी खुलासा करावा. प्रशासकीय कारवाई का करण्यात येऊ नये ? असे नोटीसीत नमूद असून सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी अविनाश कारडे यांनी ही नोटीस काढली आहे. संभाजीराजे छत्रपती परिवाराची तुळजापूर मंदिरात दर्शनासाठी येण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. यावेळी मात्र त्यांना गाभाऱ्यात जाण्यापासून अडवण्यात आल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

9 मे रोजी काय घडली घटना?

संभाजीराजे छत्रपती 9 मे रोजी तुळजापूरात आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आले होते. शेकडो वर्षांपासून त्यांच्या घराण्याची गाभाऱ्यात जात आरती करण्याची परंपरा आहे. असे असताना मात्र यावेळी संभाजीराजेंना थेट गाभाऱ्यात प्रवेश नाकारण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे इतर भाविकांप्रमाणे छत्रपती संभाजीराजेंनाही अडवण्यात आले. यावेळी संभाजीराजेंनी जिल्हाधिकाऱ्यांना फोनही केला होता. मात्र त्यांना तरीही गाभाऱ्यात प्रवेश देण्यात आला नव्हता. यामुळे अनेक वर्षांची परंपरा मोडल्याने संभाजीराजे नाराज झाले होते.

तुळजापुरात गुरूवारी होता कडकडीत बंद ?
संभाजीराजे छत्रपती यांना गाभऱ्यात प्रवेश न दिल्याने नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे गुरूवारी तुळजापुरात कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. या प्रकाराबद्दल तुळजापूर देवस्थानने दिलगिरी व्यक्त केली आहे. तरीही नागरिकांनी कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यानंतर या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...