आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:राज्य आइस हॉकी स्पर्धेत उस्मानाबाद संघास रौप्य

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आइस हॉकी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व न्यू आइस हॉकी असोसिएशन नागपूरच्या वतीने कोची (केरळ) येथे घेण्यात आलेल्या वरिष्ठ गटातील आठव्या राज्यस्तरीय आइस हॉकी स्पर्धेत उस्मानाबादच्या आइस हॉकी संघाने रौप्यपदक पटकावले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण दक्षिणेतील अभिनेता रियाज खान व त्यांची पत्नी उमा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आइस हॉकी असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव विजयानंद सुरवसे, स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष लालसिंग यादव, सोलापूर जिल्हा सचिव नवनाथ रणदिवे, स्पर्धा संयोजन समितीचे सदस्य रामचंद्र रणदिवे, सातारा जिल्हा सचिव अमोल साठे, अजय पाटील आदींसह राज्य संघटनेचे पदाधिकारी व खेळाडू उपस्थित होते.

रौप्यपदक विजेत्या उस्मानाबाद संघात राष्ट्रीय आइस हॉकीपटू अजिंक्य जाधव, अभिजित कंदले, उत्कर्ष होनमुटे, कैलास लांडगे, विनोद शेटे, गणेश बिद्री, अमित बहिरे, रणजित जोगदंड आदींचा समावेश होता. कोचीचे आइस हॉकी मैदान दणाणून सोडणाऱ्या उस्मानाबादच्या संघाने स्पर्धेत साखळी पद्धतीत सोलापूर, सातारा व परभणी संघावर गुणांकाच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. उपांत्य फेरीत परभणी संघास पराभूत करुन अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. अटीतटीच्या अंतिम लढतीत उस्मानाबाद संघास सांगली संघाकडून पराभव पत्करावा लागला.

बातम्या आणखी आहेत...