आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा‎ स्पर्धेचे आयोजन:उस्मानाबाद महिला वाहकाचा‎ गोळा फेक स्पर्धेत दुसरा क्रमांक‎

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎महाराष्ट्र राज्य परिवहन‎ महामंडळाच्या ५७ वी वार्षिक क्रीडा‎ स्पर्धा अहमदनगर येथे ३१ जानेवारी‎ ते दोन फेब्रुवारी दरम्यान पार पडली.‎ यात उस्मानाबाद आगारातील‎ महिला वाहक अश्विनी नागनाथ‎ बनसोडे यांनी गोळा फेक स्पर्धेत‎ सहभागी होत दुसरा क्रमांक‎ पटकावला आहे.‎ महामंडळाच्या तीन दिवशीय क्रीडा‎ स्पर्धेचे आयोजन अहमदनगर‎ येथील आत्मा मालिक शैक्षणिक व‎ क्रीडा संकुलावर करण्यात आले‎ होते.

यात राज्यभरातील विविध‎ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यात‎ गोळा फेक या क्रीडा प्रकारात‎ बनसोडे यांनी सहभागी घेतला होता.‎ या प्रकारात तब्बल २४ खेळाडूंनी‎ सहभाग घेतला होता. पहिल्या दोन‎ राउंड मध्ये बनसोडे यांनी अग्रक्रम‎ घेतला होता. त्यानंतर झालेल्या‎ अंतीम तिसऱ्या राउंड मध्ये बनसोडे‎ यांनी औरंगाबादच्या खेळाडूला मागे‎ टाकले.‎

बातम्या आणखी आहेत...