आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील रविवारच्या बाजारातून नागरिक भाजीपाला नव्हे, रोगराई पसरवणाऱ्या किटकांची खरेदी करावी लागत असल्याचा प्रकार होत आहे. विक्रेत्यांना चक्क कचऱ्याच्या ढिगांशेजारी बसून विक्री करावी लागत आहे. यामुळे तेथून भयंकर रोग पसरवणारे किटाणू भाजीपाल्यावर बसून शहरवाशियांच्या घरात प्रवेशित होत आहेत. यामुळे पालिकेने येथे किमान बाजाराच्या आदल्या दिवशी स्वच्छता करण्याची गरज आहे.
शहरात दर रविवारी आठवडी बाजार आंबराईत असलेल्या परिसरात भरवला जातो.येथे अनेक शेतकरी, व्यापारी भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येतात. याच परिसरात शहरातून वाहणारा मोठा नाला असून या नाल्याच्या दुतर्फा भाजीपाला विक्रीसाठी शेतकरी व व्यापारी ठाण मांडून बसलेले असतात. नाला गेल्या कित्येक महिन्यांपासून घाणीने तुडुंब भरला आहे. तसेच परिसरातील काही दुकानदार, नागरिक कचराही येथेच टाकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.