आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखकर्ता दुखहर्ता:उमरगा पोलिस ठाणे हद्दीतील 24 गावांमध्ये एक गाव एक गणपती ; गर्दीवर नियंत्रणासाठी सज्जता

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचा संसर्ग ओसरला असल्यामुळे सरकारकडूनही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.असे असले तरी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार तालुक्यात ७३ पैकी २४ गावांत संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे.

यंदा गतवर्षीपेक्षा दुप्पटीहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांनी परवानगी घेतली आहे. मागील वर्षी पोलीस ठाणे हद्दीतील ७२ गावांपैकी एक गाव एक गणपती संकल्पना ३७ गावात राबवली होती. ४६ गावांत सार्वजनिक गणेश मंडळांनी तर उमरगा शहरात १६ मंडळांनी गणपती स्थापना केली होती. मात्र, यावेळी तब्बल १७८ गणेश मंडळांनी परवानगी घेतली आहे. एक गाव, एक गणपती ही संकल्पना राबविणारी गावे यंदाच्या वर्षात कमी झाली आहेत. गेल्या वर्षात ३७ गावात एक गणपती होता. यंदा घट होवून केवळ २४ गावांनी एक गाव एक गणपती संकल्पना राबवली आहे, असे यावेळी दिसून आले.

या गावात एक गाव एक गणपती अभिया
उमरगा तालुक्यातील धाकटेवाडी, हंद्राळ, कुन्हाळी, भिकार सांगवी, शाहूनगर, पारसखेडा, व्हंताळ, दाबका, पळसगाव, नागराळ, ज़केकुरवाडी, दगडधानोरा,कोळेवाडी, गुरूवाडी, बेटजवळगा, मानेगोपाळ, कोरेगाव, भगतवाडी, चिरेवाडी, थोरलेवाडी, चंडकाळ, मळगीवाडी, चिंचकोटा, नेहरूनगर तांडा या २४ गावांनी ही संकल्पना राबविली आहे. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

डॉल्बी,डीजेला परवानगी नाही
विसर्जनाच्या मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांना परवानगी आहे पण डॉल्बी,डीजेला परवानगी नाही. दरम्यान, गणेशोत्सव काळात मंडळांनी अधिकाधिक समाजोपयोगी उपक्रम राबवावेत असे आवाहन पोलीस निरिक्षक मनोज राठोड यांनी नुकत्याच झालेल्या शांतता समिती बैठकांमध्ये केले होते.

बातम्या आणखी आहेत...