आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडसाद:चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याविरुद्ध संताप; मोर्चा, निदर्शने करून निषेध

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथील कार्यक्रमात महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शिक्षण संस्था उभारल्या, असे बेताल वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा उस्मानाबादेत भीम निर्णायक युवा समूह, वंचित बहुजन आघाडी, जय भीम प्रतिष्ठान व इतर सामाजिक संघटनांच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारुन व प्रतिमेचे दहन करुन निषेध करण्यात आला.

निवेदनात म्हटले आहे की, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या महापुरुषांबद्दलच्या वक्तव्यामुळे बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. अलीकडे भाजपच्या जबाबदार व्यक्तींकडून महापुरुषांबद्दल जाणीवपूर्वक अवमानकारक वक्तव्ये करण्यात येत आहे. अशा लोकांना राजीनामा घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी. निवेदनावर भीम निर्णायक युवा समूहाचे संस्थापक सचिन दिलपाक, नंदकुमार हावळे, सचिन गायकवाड, विनोद बनसोडे, गौतम बनसोडे, विष्णू कांबळे, संतोष बनसोडे, वंचित नेते आनंद गाडे, भैयासाहेब नागटिळे, विकास बनसोडे, पृथ्वीराज चिलवंत, अलंकार बनसोडे, विजय बनसोडे, आदर्श बनसोडे, आकाश बनसोडे, कुंदन वाघमारे, नवज्योत शिंगाडे, महादेव माळी, बाबासाहेब कांबळे, अशोक गोरे, कुंदन चिलवंत, अप्पासाहेब सिरसाठे, राजाराम बनसोडे, अक्षय गंगावणे, रमेश बनसोडे, सुशांत बनसोडे, रोहित वाघमारे, प्रतीक गंगावणे, विश्वजीत बनसोडे, धम्मानंद वाघमारे, शंकर जगतकर, प्रशांत गोरे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

तुळजापुरात पोलिस ठाण्यावर मोर्चा
तुळजापूर ।
उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील या महाषुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा तुळजापूर शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आ.) वतीने निषेध करण्यात आला. तुळजापूर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून चंद्रकांत पाटील यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

तुळजापूर शहरातील डॉ. आंबेडकर चौकात उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रिपाइंच्या वतीने तुळजापूर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून पोलिस निरीक्षक आजिनाथ काशीद यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवण्यात आले. याप्रसंगी रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, तालुकाध्यक्ष बाबा मस्के, शहराध्यक्ष अरुण कदम, युवक शहराध्यक्ष अमोल कदम, आप्पा कदम, प्रकाश कदम, अतिश कदम, दीपक कदम, रवी वाघमारे, शरद कदम, अक्षय कदम, निशांत कदम, चेतन कदम, अनुज कदम, अंकुश माने, तानाजी डावरे, दीपक कदम, चंचाळ कदम, धनू कदम, राहुल सोनवणे, सोनु कदम, विनोद भालेकर, नागेश कदम, विश्वनाथ रोकडे, आकाश मस्के, डिगंबर हावळे, दाजी माने, महादेव सोनवणे, बाळू वडवराव, दशरथ सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कळंबमध्ये कायदेशीर कारवाईची मागणी
कळंब । महापुरुषांबद्दल अवमानकारक व वादग्रस्त वक्तव्य करणारे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व जगदीश गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली.निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत पैठण येथील संतपीठाच्या पहिल्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बेताल वक्तव्य करुन महापुरुषांच्या शैक्षणिक कार्याचा अवमान केला आहे. मागील काही महिन्यांपासून भाजपचे नेते व पदाधिकारी सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करुन महापुरुषांचा अवमान करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र व केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांना समज द्यावी.

त्यांना अवमानकारक वक्तव्य करण्यापासून वेळीच रोखावे. दरम्यान, या मागण्यांसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख अनिल हजारे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बी. डी. शिंदे, प्रा. अरविंद खांडके, रसूल खान, सूरज वाघमारे, सुहास शिंदे, बंटी गायकवाड, अजय माने, विशाल वाघमारे, अप्पासाहेब हजारे, महेश गायकवाड, विशाल धावारे, राहुल गाडे, अमित गांजीकर, प्रतिक निकाळजे, पिंटू गवळी, आदमाने, शरद गाडे, सनी हजारे आदी उपस्थित होते.

मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासह कायदेशीर कारवाईची मागणी
१. उस्मानाबादेत विविध संघटनांच्या वतीने डॉ . बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून चंद्रकांत पाटलांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. २. तुळजापुरात पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून चंद्रकांत पाटलांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...