आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीएफ ७ व्हेरियंट मुळे आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. याच पाश्र्वभूमीवर शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लॅन्ट कार्यान्वित करण्यात आला असुन प्रति मिनिट ६०० एलपीएम ऑक्सिजन मिळणार आहे. कोरोनाच्या काळात विदारक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन मदत केली आहे. त्याच बरोबर भारता सह विदेशातील संस्थांनी सुध्दा मदतीचा हात दिला आहे. अनेक संस्थानी आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी विविध प्रकारे मदत केली आहे.
अमेरिकेअर्स इंडिया फाउंडेशन २००६ मध्ये नोंदणीकृत एक सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे. मदत आणि जीवन बदलणाऱ्या आरोग्यासह गरीबी किंवा आपत्तीमुळे पीडित लोकांना मदत देणारे फाऊंडेशन असुन त्याच बरोबर औषध आणि वैद्यकीय पुरवठा करते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना अनेकांना योग्य उपचार मिळाले नाहीत. तर काहीना अॉक्सिजन बेड मिळाले नसल्यामुळे त्यांना जिव गमवावा लागला होता.
या गोष्टीचा गांभीर्याने विचार करुण अमेरिकेअर्स इंडिया फाउंडेशन ने महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांना आधार देत ६०० एलपीएम पीएसए ऑक्सिजन प्लॅन्ट ची सामग्री देणगी स्वरूपात दिलेली आहे. अनेक प्लॅन्ट कार्यान्वित झाले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्य़ातील कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात अॉक्सिजन प्लॅन्ट देणगी स्वरूपात दिला होता. याचे काम पुर्ण करुन सर्व सामग्री बसवण्यात आली आहे. अॉक्सिजन प्लॅन्ट मधील सामग्री कशी वापरायची, किती अॉक्सिजन तयार होतो. याचे अॉनलाइन ट्रेनिंग उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व परिचारीका यांना देण्यात आले आहे. दुसऱ्या लाटेत अधिकाऱ्यांना अॉक्सिजन देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.