आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पाचुंदा वीज उपकेंद्रातील दुरध्वनी चालू ; दैनिक दिव्य मराठी वृत्ताचा परिणाम

काक्रंबाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील १८ गावाना वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या तुळजापूर लातुर महामार्गावरील पांचुदा येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रात नागरिकांच्या विजेच्या अडीअडचणी व समस्यांचे निवारण व अपतकालीन काळात वेळीच संदेश देण्यासाठी ठेवण्यात आलेला दुरध्वनी गेली दोन वर्षापासून बंद असल्याचे वृत्त दैनिक दिव्यमराठी गुरूवार च्या अंकात प्रकाशित होताच कारवाईच्या भितीने खडबडून जागे झालेल्या ऑपरेटरने फोन चालू केल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकां मधून व्यक्त करत दिव्य मराठी चे आभार मानले आहेत .

तुळजापूर नागपूर रत्नागिरी महामार्गावर कार्यरत असलेल्या महावितरणच्या पांचुदा येथील ३३ के.व्ही.उपकेंद्रातून तालुक्यातील काक्रंबा ,होनाळा,खंडाळा,वगाव लाख,होनाळा,कार्ला,मोर्डा,काक्रंबावाडी, जवळगा,सिंदफळ,अमृतवाडी,शिराढोण,ढेकरी,आपसिगां,कामठा,कात्री,सांगवी,मसला आदी १८ गावासह शेतीला या ठिकाणाहून विज पुरवठा करण्यात येतो. मात्र या उपकेंद्राच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे गेली दोन वर्षापासून या ठिकाणचा दुरध्वनी बंद ठेवण्यात आलेला होता.त्यामुळे ऐन वेळी निर्माण होणाऱ्या विजेच्या समस्या व अपतकालीन काळात घटना घडल्यास त्याची माहिती अथवा संदेश देण्याची शेतकरी व नागरिकांची मोठी अडचण होवून बसली होती.

या बाबत दैनिक दिव्य मराठीने गुरूवार दि ३ रोजी उपकेंद्रातील निष्क्रिय व कामचुकार कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक बंद ठेवल्याचे वृत प्रकाशित करताच कारवाईच्या भितीने ऑपरेटरने दोन वर्षापासून बंद ठेवलेला मोबाइल दुरध्वनी क्र.99751 55508 हा काल पासून सुरू केल्याने समाधान व्यक्त होत आहे. सध्या रबी हंगाम सुरू आहे. शेतकऱ्यांना विजेच्या समस्या निर्माण होत आहे.

▪दुरध्वनी सुरू बायोमेट्रिक मशीन मात्र बंदच▪
पाचुंदा उपकेंद्राच्या ठिकाणचा मोबाइल दुरध्वनी सुरू केला असून महावितरणने कामचुकार व निष्क्रिय कर्मचाऱ्यांवर आळा घालण्यासाठी बसवलेली बॉयोमेट्रीक थंब मशीन मात्र दोन वर्षापासून बंद अवस्थेत आहे. या ठिकाणी नियुक्त केलेले चार ऑपरेटर मंडळी आपआपल्या सोयीनुसर कामकाज करत असल्याने महावितरण ने तात्काळ हि बाॅयोमेट्रिक मशीन सुरू करून कामचुकार व दांडी बहदार कर्मचाऱ्यांना लगाम घालावा, अशी मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...