आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील कॉमर्स विभागाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्ड बी. कॉम तृतीय वर्षाची विद्यार्थीनी पल्लवी जगताप हिने पटकावला. दिशा फाउंडेशनच्या नीता शेट्टी, उपप्राचार्य डॉ. संजय अस्वले, कॉमर्स विभागाचा माजी विद्यार्थी आदर्श सरपंच अमर सूर्यवंशी, डॉ. केशव लेंगरे, डॉ. अजित आष्टे यांच्या हस्ते मंगळवारी (दि. ७) पुरस्कार देण्यात आला. कॉमर्स विभागातील बीकॉम प्रथम, द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप देत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी कॉमर्स असोसिएशन व क्वालिटी सर्कलचे सचिव, सहसचिव, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बीकॉम द्वितीय वर्षाचे कृष्णा सूर्यवंशी, साई दीक्षित, विश्वास सोनवणे, विष्णू पवार, तनुजा कोकाटे, शितल माने, श्वेता माने, श्रुती माळी, ऋतिका शेळके, प्रतीक्षा यादव आदी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. कॉमर्स विभागाचे प्रा. खंडू मुरळीकर, मेगा हिरेमठ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतीक्षा यादव हिने ऋतिका शेळके हिने सूत्रसंचालन तर डॉ अस्वले यांनी आभार मानले.
आवडीच्या क्षेत्रात करिअर
विद्यार्थ्यांनी भविष्यात आपल्या आवडीच्या क्षेत्रात करीअर करण्यासोबत आपलं व्यक्तिमत्व घडवून महाविद्यालय आणि आई-वडिलांचे नाव उज्वल करावे, असे प्रतिपादन आपल्या अनुभवातील मनोगतात अमर सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने माजी विद्यार्थिनी नीता शेट्टी, ख्वाजा मुजावर यांचाही सन्मान केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.