आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील पंचायत समितीतील घरकुल घोटाळ्यात बनावट मजूरांची यादी तयार करून चार लाख ९४ हजार रुपयांचा घोटाळा करणाऱ्या तांत्रिक सहाय्यकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.येथील पंचायत समिती सध्या गैरव्यवहार व घोटाळ्याचे आगर बनली आहे. सुरुवातीला शोषखड्ड्यांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर आता घरकूल घोटाळा गाजत आहे.
यामध्ये येथील पंचायत समितीत कार्यरत असलेला तांत्रिक सहाय्यक विश्वनाथ ज्ञानेश्वर राउत ( रा. उस्मानाबाद) याने दि. ३ जून ते दि. १५ सप्टेंबर या दरम्यानच्या काळात मनरेगा कामातील बनावट मजूर दाखवून त्यांची यादी तयार करुन त्या मजुरांच्या कामाचा मोबदला म्हणून चार लाख ९४ हजार रुपये हडप केले.
रक्कम ही संगणकावर डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करुन अपहार केला. याप्रकरणी गट विकास अधिकारी नंदकिशोर शेरखाने यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी डाॅ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे. शोषखड्यांच्या घोटाळ्याप्रमाणेच घरकुल घोटाळ्यातही असेच काही अधिकारी असल्याचा प्रशासनाचा संशय आहे. त्या दृष्टीने तपास करण्यात येत असल्याचे समजते. दरम्यान, याची चौकशी वेगाने करून संबंधितांवर कारवाई करण्याची गरज आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.