आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान:पिकांचे ४८ तासांत पंचनामे करा; मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे निर्देश

उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात सततचा पाऊस व काही मंडळात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. कृषी विभागाने पीक पाहणीचे काम सुरू केले. उर्वरित क्षेत्राची पीक पाहणी येत्या ४८ तासांत करून अहवाल सादर करावेत, असे आदेश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, झेडपी सीईओ राहुल गुप्ता, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विकास जाधव, ग्रामीण विकास यंत्रणेच्या संचालक प्रांजल शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झडे उपस्थित होते.

जिल्ह्यातील पीक नुकसानीचे उर्वरित पंचनामे ४८ तासांत पूर्ण करून शासनास अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन प्रा. डॉ. सावंत यांनी जिल्ह्यातील पीक परिस्थती, पावसाचे प्रमाण, धरण, रस्त्यांचे बांधकाम, नागरिक, शेतकऱ्याच्या प्रश्नांच्या अनुषंगाने प्रशासनास सूचना दिल्या. पिकांच्या नुकसानीबाबत पंचनामे करावयाच्या अंदाजीत शेतकऱ्यांची संख्या एक लाख ७४ हजार ११३ आहे. त्यातील १ लाख ५५ हजार ७२९ हेक्टर क्षेत्र अपेक्षित आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ९७ हजार ५७ शेतकऱ्यांच्या ८५ हजार ४०१ हेक्टरचे पंचनामे करण्यात आले आहेत. ७७ हजार ५५ शेतकऱ्यांच्या ७० हजार ३२८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ५४.८४ टक्के पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...