आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान:जळकोट परिसरात पंचनामे सुरू

जळकोट6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग, जळकोट, नंदगाव विभागात संततधार पावसामुळे सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.

जळकोट, नळदुर्ग, आलियाबाद, रामतीर्थ, येडोळा, हंगरगा (नळ), बोरगाव, नंदगाव, लोहगाव, जळकोटवाडी, मुर्टा, होर्टी, चिकुंद्रा, मानमोडी आदी परिसरात मागील ३-४ दिवसांपासून संततधार चालू आहे. शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान झाले. जिल्हा परिषदेचे सदस्य तथा माजी सभापती प्रकाश चव्हाण यांनी तत्काळ सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. आलियाबाद शिवारात पंचनामे करण्यात आले. यावेळी कृषी सहायक, एस. आर. माने, पोलिसपाटील शिवाजी चव्हाण, विनायक चव्हाण, देविदास चव्हाण, मोतीराम राठोड, सिद्राम पवार, यशवंत राठोड, माणिक राठोड, विक्रम चव्हाण, धोंडीराम चव्हाण, संदीप राठोड आदी शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...