आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकहाती सत्ता:पांगरदरवाडी ग्रामपंचायत निवडणूक, मातब्बर नेत्यांचा दारुण पराभव

तामलवाडीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील पांगदरवाडी ग्रामपंचायतीवर तुळजाभवानी ग्रामविकास परिवर्तन पॅनलची एकहाती सत्ता आली असून तरुणांच्या हाती सत्तेच्या किल्ल्या आल्या आहेत.तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी ग्रामपंचायतच्या १० जागेसाठी १८ डिसेंबरला मतदान घेण्यात आले होते. या मतदानाचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस पुरस्कृत पॅनलला दहा पैकी दहा जागा मिळाल्या असून प्रतिस्पर्धी सलग सत्तेत असणाऱ्या पॅनलचा धुव्वा उडाला आहे.

सत्ताधारी गटाविरुद्ध जुना भाजप गट, काँग्रेस, शिवसेना या गटात दुरंगी लढत झाली होती. या लढतीत सत्ताधारी आजी-माजी मात्तबर नेत्यांचा दारुण पराभव झाला असून तरुणांच्या हाती सत्ता आली आहे.

सरपंचपदी सिंधु कृष्णाथ पोफळे या थेट जनतेतून निवडून आल्या असून प्रभाग क्रमांक एक मधून सोमनाथ ज्ञानदेव शिंदे, किरण गणेश गायकवाड, अमृपाली बाळासाहेब डोंगरे या बहुमताने निवडून आल्या आहेत. तर प्रभात क्रमांक दोन मधून लक्ष्मण मोहन क्षीरसागर, सावित्रा सोमनाथ शिंदे, तुळसाबाई धनाजी शेळके या निवडून आल्या आहेत. तर प्रभाग क्रमांक तीन मधून सोनाली महेश सावंत, बापू शिवाजी साळुंके व आलीफ रफिक सय्यद हे उमेदवार बहुमताने निवडून आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...