आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सोमनाथ शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून तरुणांच्या हाती एकहाती सत्ता आली आहे. गुरुवार दि.५ जानेवारी रोजी सरपंच सिंधू कृष्णात पोफळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी.एल.वाघमारे व ग्रामसेविका महादेवी गलांडे यांनी कामकाज पहिले. पांगरदरवाडी ग्रामपंचायतच्या १० जागेसाठी १८ डिसेंबरला मतदान घेण्यात आले होते. या निवडणुकीमध्ये भाजप, काँग्रेस, शिवसेना पुरस्कृत पॅनलने १० जागेवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे.
सलग तीन वेळा कायम सत्तेत असणाऱ्या मातब्बर नेत्यांना तरुणांनी पराभवाची धुळ चारली. शासनाच्या मिळणाऱ्या प्रत्येक योजनेचा लाभ हा गावातील प्रत्येक गोर गरीब गरजू कुटुंबापर्यंत पोचवण्यास कायम कटिबद्ध असून गावकऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आपण कायम ऋणी असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित उपसरपंच सोमनाथ शिंदे यांनी दिली.
यावेळी सरपंच सिंधु कृष्णाथ पोफळे, सोमनाथ ज्ञानदेव शिंदे, किरण गणेश गायकवाड, अमृपाली बाळासाहेब डोंगरे, लक्ष्मण मोहन क्षीरसागर, सावित्रा सोमनाथ शिंदे, तुळसाबाई धनाजी शेळके, सोनाली महेश सावंत, बापू शिवाजी साळुंके, आलीफ रफिक सय्यद या सदस्यांचा पॅनेल प्रमुखांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.