आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील पोलिस ठाण्याच्या वतीने मंगळवारी (दि.१४) घेण्यात आलेल्या महारक्तदान शिबिरात ३१४ जणांनी रक्तदान केले. कर्मवीर डॉ़. जगदाळे मामा ब्लड बँक बार्शी यांच्या सहकार्यातून रक्तसंकलन करण्यात आले. पोलिसपाटील, होमगार्ड, कमांडो करीअर अकॅडमी परंडा, क्रांतीसागर अकॅडमी परंडा, पोलीस मित्र यांच्या संयुक्त प्रयत्नाने शिबिर पार पडले. महारक्तदान शिबिरात ३१४ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी तालुका तालीम संघाचे अध्यक्ष नवनाथ जगताप, बालाजी नेटके, सूरजसिंह सिद्दीवाल, सुरेश डाकवाले, तानाजी बनसोडे, राहुल बनसोडे, एचडीएफसी शाखेचे व्यवस्थापक डॉ पल्ला यांनी शिबिरास भेट दिली. पोलिस निरीक्षक सुनिल गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विक्रांत हिंगे, पोना रामराजे शिंदे, पोकॉ योगेश यादव, पोकॉ गोविंद मोटेगावकर व परंडा पोलिस ठाण्याचे अंमलदार यांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. रक्त दात्यांचे व रक्तपेढीचे पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे यांनी ट्रॅक सूट भेट देऊन आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.