आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रींना रूद्राभिषेक:भूम शहरामध्ये श्रीदत्त जन्मोत्सवानिमित्त पारायण सोहळ्याचे आयोजन

भूम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्रीदत्त जन्मोत्सवानिमित्त पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जन्मोत्सवानिमित्त श्री परमरहस्य पारायण सोमवारी सुरू झाले असून शुक्रवारपर्यंत चालणार आहे. बुधवारी (दि. ७) रात्री ११ वाजता ‘श्रींना रूद्राभिषेक व श्रीदत्त जन्म व आरती श्री. १०८ ष. ब्र. विरुपाक्ष गुरुगिरी शिवाचार्य मानुरकर महाराज यांच्या उपस्थितीत जन्मोत्सव होणार आहे. यावेळी तालुक्यातील हाडोंग्री येथील भजनी मंडळ तसेच भूम येथील भजनी मंडळ व वीरशैव महिला भजनी मंडळ हे भजन सादर करणार आहे. श्री ग्रंथराज परमरहस्य पारायणाची सांगता, महामंगल आरती होईल.

बातम्या आणखी आहेत...