आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दाळींब निपुण भारत अंतर्गत इयत्ता पहिली ते तिसरीतील पालकांचे माता पालक गट तयार केलेले असून विशेषतः माता पालक गटाच्या लीडर प्रमुखांसह माता पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे प्रथम पूजन झाले. महिला शिक्षिका शर्मिला कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.
मुख्याध्यापक अब्दुल कादर कोकळगावे यांनी आपल्या मार्गदर्शनातून लीडर प्रमुखांनी काय कार्य करावे, आठवड्यातून पालकांना कशी भेटी द्याव्यात शासनाकडून मिळालेले व्हिडिओ ऑडिओ पालकांना दाखवून पालकांचे उद्बोधन केले. आपल्या मुलांना मुलींना कसे शिकवावे, कसे संस्कार घडवावेत यासाठी काही साेयी करण्यात आल्या आहेत.
दाळींब ग्रामपंचायतीकडून संध्याकाळी ७ ते ९ जो गजर होतो त्या गजराच्या कालावधीमध्ये अभ्यासाला बसून घरातील टीव्ही मोबाईल बंद करून अभ्यासाची तयारी कशी घ्यावी पालकांच्या व शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थी गुणवत्ता कशी वाढेल, या मिशन अंतर्गत शासनाचा काय उद्देश आहे इत्यादी बाबीवर त्यांनी सविस्तर माहिती दिली.
उज्वला बिरादार व आशा माने यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुलक्षणाताई कांबळे यांनी उपस्थित राहून मातांना मार्गदर्शन केले. तेव्हा माता गटाच्या लीडर कलिमा रब्बानी शिलार यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या आयेशा जेवळे व लीडर माता सुवर्णा बसवराज सारणे , अश्विनी साबणे, मनीषा गायकवाड, निलोफर खजुरे, प्रियंका विनोद पावडशेट्टी, श्रीदेवी जोजन, नाजमीन हमीद मुल्ला ,प्रियंका सुनील गायकवाड, सलीमा शेख अशा एकूण ५० ते ५५ लीडर माता उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन शुद्धमत्ता भोसले , सुनिता पोद्दार, रत्नमाला सगर, प्रवीण शिंदे व जेष्ठ शिक्षक सुभाष सुरवसे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार वैशाली ढेरे यांनी मानले.विद्यार्थी आणि विद्यार्थिनींबरोबरच पालकांनाही शाळेच्या उपक्रमात सहभागी करून घेण्याचे विविध उपक्रम शिक्षण खात्याने आखले आहेत, त्यापैकी हा एक उपक्रम होय.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.