आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालक मेळावा‎:कुमारस्वामी विद्यामंदिरात पालक मेळावा‎

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित‎ शहरातील कुमारस्वामी प्राथमिक‎ विद्यामंदिरात शनिवारी (४) द्वितीय‎ सत्रातील विशेष पालक मेळावा झाला.‎ मुख्याध्यापक कविराज रेड्डी‎ अध्यक्षस्थानी होते. यावेळी पालक राम‎ लोहार, संध्या इंगळे तसेच पदाधिकारी‎ उपस्थित होते. मुख्याध्यापक रेड्डी यांनी‎ प्रास्ताविकात विविध शासकीय योजना,‎ सहशालेय उपक्रम, विद्यार्थ्यांची‎ शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी‎ पालकांनी शाळेला सहकार्य‎ करावे,शाळेत देण्यात आलेल्या‎ अभ्यासाची पुनरावृत्ती व सराव घ्यावा‎ असे आवाहन केले.

विद्यार्थी स्पर्धेत‎ टिकवून ठेवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांची‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ गुणवत्ता सुधारणा व्हावी यासाठी पुढील‎ शैक्षणिक वर्षात शाळेत विशेष प्राविण्य‎ वर्ग सुरु करण्यात येणार आहेत असे ते‎ म्हणाले. यावेळी पालकांनी आपल्या‎ पाल्याविषयी शिक्षकाबरोबर चर्चा करून‎ शैक्षणिक उणीव पूर्ण करण्यासाठी प्रयत्न‎ करावे. शाळेत विविध प्रकारच्या स्पर्धा‎ परीक्षेचे आयोजन करण्यात येते, त्यात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग‎ नोंदविण्यात यावा असे आवाहन केले.‎ शिक्षक प्रतिनिधी ब्रह्मानंद गायकवाड‎ यांनी विद्यार्थ्यांनी स्वच्छ‎ गणवेश,शाळेची शिस्त, नीटनेटकेपणा व‎ वेळेचे नियोजन याविषयी मार्गदर्शन‎ केले. तर सहशिक्षिका शोभा भुसार यांनी‎ आपले विचार मांडले.‎

बातम्या आणखी आहेत...