आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आदर्श विद्यालयात दहावी विद्यार्थ्यांचा पालक मेळावा

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हळूवारपणे मायेच्या अंतकरणाने आई- वडील आणि गुरूजनांनी मुलांवर संस्कार करुन व्यक्तिमत्व फुलवावे. गुणवत्ता अन मार्क वेगळे असून गुणवत्तेची दुसरी बाजू मार्क आहेत. पालकांनी पाल्याकडे सकारात्मक दृष्टीने पहावे, मनमोकळेपणाने त्यांच्याशी संवाद साधा, प्रत्येकांची बुद्धिमत्ता वेगळी असते. इतर मुलांशी आपल्या मुलांबरोबर तुलना करू नका. असे मत माजी प्राचार्य श्रीहरी जाधव यांनी व्यक्त केले.

श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आदर्श विद्यालयामध्ये शनिवारी (३) आयोजित दहावी विद्यार्थी यांच्या पालक मेळाव्यात माजी प्राचार्य जाधव बोलत होते.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सोमशंकर महाजन होते. यावेळी मुख्याध्यापक शिवराज औसेकर, पर्यवेक्षक बी. एम. पाटील, विश्वनाथ महाजन आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना माजी प्राचार्य जाधव म्हणाले की, पाल्याचे व्यक्तिमत्त्व घडताना पालकाचा मित्र परिवार व परिसराचा ही त्याच्यावर परिणाम होतो म्हणून मित्र चांगले निवडा.पाल्य बिघडायला आपल्या घरापासून सुरुवात होते म्हणून घरी कुटुंबासोबत पालकांचे वागणे, बोलणे व वर्तन हे आदर्शवादी व प्रेरणादायी असावे. यावेळी निर्मला चिकुंद्रे यांचेहि मार्गदर्शन झाले. शिक्षक सुरेश शेंडगे यांनी प्रास्ताविक केले. सैपन शेख यांनी सूत्रसंचलन केले. सहशिक्षक राजेंद्र जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक, पालक उपस्थित होते.

टीव्ही, माेबाइल बंद ठेवून पुस्तके वाचा
प्राचार्य महाजन म्हणाले की, पाल्य अभ्यास करीत असताना पालकांनी घरातील टीव्ही, मोबाईल शक्यतो बंद ठेवून चांगली पुस्तके, ग्रंथ वाचावेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यास करण्याच्या वेळेचे नियोजन करावे, त्यांना अभ्यासाला पूरक असे चांगले वातावरण देण्याच्या सुचना करून पालकांचेहि चार प्रकार असल्याचे सांगितले.

त्यात विवेकी, प्रेरणा देणारे व हुकुमशाही, लोकशाही अशा पालकांमुळे घरामध्ये काय बदल होतो हे उदाहरणासह सांगून आत्मपरिक्षण करण्यास सांगितले. पालकांच्या वर्तनाचा मुलांवर मोठा परिणाम होतो असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...