आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षेचे वेळापत्रक:इयत्ता बारावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल

उस्मानाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये होणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) पुरवणी परीक्षा २१ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत आयोजित केली होती. परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले. मात्र, या वेळापत्रकात तांत्रिक कारणामुळे अंशत: बदल करण्यात आल्याचे विभागीय कार्यालयाने कळवले आहे.

त्यानुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) पुरवणी परीक्षेतील व्यावसायिक द्विलक्षी अभ्यासक्रम पेपर-एक आणि पेपर- दोन या विषयांच्या ६ ऑगस्ट ते १० ऑगस्ट तसेच १२ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळ आणि दुपारच्या सत्रात आयोजित करण्यात आलेल्या विषयाच्या परीक्षेस श्रेणी सुधार योजनेंतर्गत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी महाराष्ट्र राज्याच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) होत असल्याने वेळापत्रकात अंशत: बदल केला. वेळा पत्रकातील अंशत: बदलाची सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, पालक आणि अन्य घटक यांनी नोंद घ्यावी. तारखेबाबतचे सुधारीत वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर १ ऑगस्ट २०२२ पासून उपलब्ध करुन दिल्याचे पुणे येथील महाराष्ट्र राज्याच्या सचिव अनुराधा ओक यांनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...