आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील शिक्षण प्रसारक मंडळ अणदूर संचालित माध्यमिक विद्यालय येवती येथे विद्यार्थ्यांच्या कृतिशील सहभागाने अभ्यासक्रमातील प्रात्यक्षिके घेण्यात आली. विज्ञानवाहिनी उपक्रमाच्या फिरत्या प्रयोगशाळेत परिसरातील शाळा व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
तुळजापूर तालुक्यातील शाळांचे मुख्याध्यापक, विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. या फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून विज्ञान वाहिनीचे विवेक एरंडे, दत्तात्रय देवल, विनायक दिक्षित, यशश्री वाघ, गजानन रानडे या सर्व सेवानिवृत्त शिक्षकांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना प्रयोग प्रात्यक्षिके शिकवली जात आहेत. फिरत्या प्रयोगशाळेच्या बसमध्ये अंधश्रद्धा, विषारी, बिनविषारी सापांबद्दलच्या चित्रफिती अतिक शेख दाखवत आहेत.
या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक व शिक्षकांकडून कौतुक होत आहे. हॅलो मेडिकल फाउंडेशन अणदूर, दुर्गादेवी ट्रस्ट पुणे, विज्ञान वाहिनी संस्था पुणे संचालित ग्रामीण विज्ञान केंद्र अणदूरच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम घेतला जातो. दरवर्षी १५०० विद्यार्थी सहभागी होतात. ‘हॅलो’चे अध्यक्ष डॉ. शशिकांत अहंकारी, उर्मिला परचुरे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि विज्ञान संवादक प्रसन्न कंदले यांच्या नियोजनानुसार या शाळा भेटी दिल्या जात आहेत.
कार्ला, केशेगावात उपक्रम
येवतीसह तुळजापूर तालुक्यातील कार्ला, केशेगाव येथेही हा उपक्रम राबवण्यात येत आहे. येवती येथील सादरीकरणावेळी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक किरण कुलकर्णी, विज्ञान शिक्षिका कल्पना घुगे, सिद्धलिंग स्वामी, एस. एस. शिंदे आणि कर्मचारी, पालक व ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल विज्ञान वाहिनी संस्थेचे आभार मानले. अहिल्यादेवी होळकर विद्यालय, कार्ला (ता. तुळजापूर) येथे आयोजित विज्ञान मेळाव्यात विद्यार्थ्यांनी “शिक्षक’ म्हणून भूमिका बजावली. यावेळी १९० विद्यार्थी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.