आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट स्पर्धेंचे प्रतिनिधित्व करणार:तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत भाेसले हायस्कूलच्या चार संघांचा सहभाग

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा क्रीडा कार्यालय, उस्मानाबाद यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धा के.टी पाटील क्रीडा संकुलावर दि. ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २२ दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये भोसले हायस्कूलच्या चार संघांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत १४ वर्ष वयोगट मुलांचा संघ प्रथम क्रमांक पटकावून विजेता ठरला. या संघाचा कर्णधार कु. खंडाळकर कार्तिक होता.तर १७ वर्ष वयोगट मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाचा कर्णधार कु.शेलार कल्पेश होता. १९ वर्ष मुलांच्या विजयी संघाचा कर्णधार लोमटे धीरज होता. १९ वर्ष मुलींच्या विजयी संघाची कर्णधार कार्तिकी पाटील ही होती. या विजेत्या संघाच्या कर्णधारांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शक प्रशिक्षक सांडसे व्ही. एस आणि वाले इंद्रजित यांचा सत्कार प्रशालेमार्फत झाला.

हे चारही संघ जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार असून या साठी प्रशालेचे प्राचार्य देशमुख एस.एस, उपमुख्याध्यापक कोळी एस.बी, उपप्राचार्य घार्गे एस.के, पर्यवेक्षक देशमुख डी.ए, गायकवाड के.वाय. जाधव आर. बी. तर संस्थाध्यक्ष सुधीर पाटील व संस्था सरचिटणीस प्रेमाताई सुधीर पाटील , प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. क्रिकेट सामन्यांमध्ये भाग घेतलेल्या मुला-मुलींच्या मेहनतीचे कौतुक केले तसेच त्यांना भावी क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...