आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभेच्छा:तामलवाडीचे पटेल दांपत्य हजला रवाना, समाजबांधवांच्या शुभेच्छा

तामलवाडी2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पटेल कुटुंबातील पती-पत्नीची हज यात्रेसाठी निवड झाली असून ते मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरुन मंगळवारी सायंकाळी रवाना झाले.

निघण्यापूर्वी बाबूलाल वजीर पटेल व शकिला बाबुलाल पटेल यांना समाजबांधवांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यात्रेला जाण्यासाठी पटेल कुटुंबीयांनी हज कमिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून नोंदणी केल्यानंतर पहिल्याच वर्षी त्यांची निवड झाली. ६५ वर्षांपेक्षा कमी वयाचे समाजबांधवच हज यात्रेला जाऊ शकतात. हा नियम कोरोना संकटानंतर करण्यात आला. हज यात्रेला जाण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. याशिवाय हजला जाण्यापूर्वी ७२ तास आधी कोरोनाचा आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...