आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखोंची विकासकामे:तुळजापूर खुर्द येथे पेव्हर ब्लॉकच्या कामास सुरुवात

तुळजापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरालगतच्या तुळजापूर खुर्द येथे पेव्हर ब्लाॅक बसवण्याचे काम सुरू आहे. दलितेतर योजनेतून पेव्हर ब्लॉक ब्लॉकचे काम सुरू आहे. यामुळे तुळजापूर खुर्दच्या सौंदर्यात भर पडणार आहे. तुळजापूर खुर्द गावात प्रवेश करताना उजव्या बाजूला प्रवासी निवाऱ्याच्या बाजूने पेव्हर ब्लाॅक बसवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले पेव्हर ब्लाॅक बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सिमेंट रस्त्याचा कडेला पेव्हर ब्लाॅक बसवण्यात येत आहे. तुळजापूर खुर्दचे नगरसेवक पंडितराव जगदाळे, मंजुषा देशमाने यांचा प्रयत्नातून व माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, युवक नेते विनोद गंगणे, पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर खुर्द येथे विविध विकासकामे सुरू आहेत.

लाखोंची विकासकामे: तुळजापूर खुर्द येथील नेताजी नगर येथे सिमेंट रस्ता- ८.५ लाख रुपये, शिंदे प्लाॅटिंग येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ९.५ लाख रुपये, सर्व्हे नं ८८ मध्ये रस्ता मजबूतीकरण-२५ लाख रुपये, भावसार भक्त निवास रस्ता मजबुतीकरण- ६.५ रूपये, उंडरे घर सिमेंट रस्ता- ६ लाख रुपये, लातूर रोड ते सरडे घर सिमेंट रस्ता- ८ लाख रुपये, यादव धर्मशाळा रस्ता मजबुतीकरण- ६ लाख रुपये, आदी विकास कामे सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...