आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:खामसवाडीत व शिराढोणमध्ये शांततेने मतदान

कळंब2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायत मध्ये गणली जाणारी खामसवाडी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी तालुक्यात नऊ उमेदवार निवडणूकसाठी उभा होते तर पंधरा सदस्यासाठी तीन पक्षाचे ४५ व दोन अपक्ष उमेदवार निवडणूक रिगंणात उभे होते गाव संवेदनशील असले तरी कुठलाच गैर प्रकार घडला नाही. मतदान पाच बुथवर सुरळीत झाले एकूण ५३९८ पैकी ४१९६ जणांनी मतदान केले.

शिराढोण ग्रामपंचायत निवडणूक एकूण अंतिम मतदानात ७३२५ पैकी ५०६१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.६९.०९% दोन्ही मतदारसंघांच्या मतमाेजणीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. यामुळे तालुक्यातील राजकारणाची गणिते बदलणार आहेत. उद्याच्या मंगळवारच्या मतमोजणीसाठी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...