आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:डिकसळ जिल्हा परिषद गटातील गावात शांततेत मतदान; उद्याच्या मतमाेजणीकडे लक्ष

डिकसळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब तालुक्यातील डिकसळ जिल्हा परिषद गटातील डिकसळ ,खडकी, पश्चिम लोहटा , करंजकल्ला . लोहटा पूर्व , कोथळा, हिंगणगाव या गावातील सरपंच व सदस्य निवडीसाठी मतदान रविवारी शांततेत पार पडले . गेल्या दोन दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणुकीने चांगलाच वेग पकडला होता. रविवारी मतदारांनी मोठा उत्साह दाखवत आपला अधिकार बजावला.

सकाळपासूनच उमेदवारांनी पहिल्यादा मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मतदार गाडीत टाकून आणण्यासाठी जोरदार पळापळ सुरु होती. वृद्ध अपंग अपघातग्रस्त आजारी यांची विशेष खातरदारी घेतली जात होती. कांही मतदान केंद्रावर नावावरून आक्षेप व वृद्धांचे मतदान करण्यावरून प्रतिनधी मध्ये शाब्दिक चकमक उडत होती. मात्र बंदोबस्त असल्याने असे शुल्लक प्रकार निवळत होते.

डिकसळमध्ये एकूण ५८६० पैकी ४२२१ ( ७२ टक्के ) ,खडकी ६९९ पैकी ६२६ (८९.५५ टक्के ), पश्चिम लोहटा १३२१ पैकी १११६ (८४. ४८ टक्के ) , करंजकल्ला १४७९ पैकी १२६६ (८५.५९ टक्के ). लोहटा पूर्व २३८६ पैकी १९४८ (८१. ६४ टक्के ), कोथळा २०२३ पैकी १७१७ ( ८४.८७ टक्के ) हिंगणगाव १०९६ पैकी ९३३ (८५ टक्के) मतदारांनी हक्क बजावला सायंकाळी साडेपाच वाजता निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या उमेदवारांचे भवितव्य सीलबंद झाले आहे . आता प्रतीक्षा आहे ती मंगळवार उजाडण्याची.

सरपंच आणि सदस्य उमेदवारांची संख्या
डिकसळ जिल्हा परिषद गटातील डिकसळ मध्ये सरपंच पदासाठी ३ तर सदस्य पदासाठी ३९ खडकी २(१४), पश्चिम लोहटा २ (१४), करंजकल्ला २(१९). लोहटा पूर्व३(३३) , कोथळा २ (१८), हिंगणगाव २(१४) उमेदवार रींगणात होते. या सगळ्यांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रात बंद झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...