आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरवाना नसतानाही दारू विक्री करून ग्राहकांना दारू पिण्यासाठी सोय करणाऱ्या उमरगा तालुक्यातील तीन ढाब्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा मारुन सात जणांना ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांना ८५ हजाराचा दंड ठोठवला आहे.राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनात तुळजापूर व उमरगा येथील पथकाने शुक्रवारी उमरगा शहर, परिसरातील ढाब्यांवर कारवाई केली.
शहरातील हॉटेल आबाचा ढाबा, हॉटेल भाग्योदय व उमरगा ते आळंद रोडवरील हॉटेल मैत्री येथे छापा मारला. तेव्हा शासनमान्य दारुविक्री परवाना नसल्याचे आढळले. ढाबा मालक, मद्यपींवर गुन्हे नोंदवण्यात आले. पथकाच्या कारवाईत मालक प्रकाश राजू डोंगरे, सोमनाथ दत्तु सुरवसे, आशिष महिंद्र कांबळे यांच्यासोबत मद्यपी ग्राहक चंद्रकांत माणिक कोराळे, दिबंगर शिवानी पाचंगे, युवराज तोतप्पा व्हनाजे, शिवानंद गुंडू बिलगुंदे यांना अटक करून प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.