आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण:नव्या सरकारमुळे जनता समाधानी, येणाऱ्या काळात भाजपची घौडदौड; भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांचे मत

उस्मानाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात जनतेला लुटणारे लुटारू सरकार सत्तेवरून गेले आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारने शेतकरी ,युवकांना,ओबीसींना तसेच सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून काम सुरू केले आहे. यामुळे महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, येणाऱ्या काळात जिल्ह्यात आमदार राणाजगजितसिंह पाटील व माजी आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून येतील आणि गल्ली ते दिल्ली असा भाजपाचा प्रवास होणार असा आत्मविश्वास पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी व्यक्त केला.

पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. यावेळी मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा कार्यकारिणी बैठकीत सरकारने ओबीसी राजकीय आरक्षण, उस्मानाबादचे नाव धाराशिव तर औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामांतर, शेतकरी आर्थिक मदत या विषयावर घेतलेल्या निर्णयांना कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रस्ताव मांडून ठरावास पाठिंबा देण्यात आला. या बैठकीत संजय कौडगे यांनीही मार्गदर्शन केले. प्रत्येक बुथपर्यंत पक्षाचा विचार पोहोचवा तसेच हर घर तिरंगा अभियान,बुथ सशक्तीकरण अभियान, मन की बात कार्यक्रम आदी संघटनेचे कार्यक्रम यशस्वी करावे असे आवाहन केले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील,ॲड.नितीन भोसले,ॲड.खंडेराव चौरे,ॲड.अनिल काळे, सतीश दंडनाईक, नेताजी पाटील, प्रदीप शिंदे, राजसिंहा राजेनिंबाळकर,अर्चना अंबुरे,विजय शिंगाडे,अजित पिंगळे,शिवाजी गिड्डे,राजकुमार पाटील,राजेंद्र पाटील, राजाभाऊ पाटील, कैलास शिंदे, संतोष बोबडे, सुरेश कवडे, महादेव वडेकर, इंद्रजित देवकते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...