आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद:टक्का वाढला, नगरपरिषदांमध्ये 88 ऐवजी 96 नगरसेविका करणार प्रतिनिधित्व

उस्मानाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नव्याने सदस्य संख्या वाढवण्यात आली आहे. त्यामुळे प्रभाग वाढले असून, महिलांचीही संख्या वाढली आहे. गेल्या वेळी जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांमध्ये ८८ महिला नगरसेविका होत्या. यंदा त्यात पुन्हा आठ महिला नगरसेविकांची जास्तीची भर पडली आहे. त्यामुळे आकडा ९६ इतका झाला आहे. तसेच सर्वसाधारण मधून काही महिला निवडून आल्यास ही संख्या अधिक वाढू शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे. नगर पालिकांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी काही महिन्यांत होण्याचे संकेत मिळत आहेत. न्यायालयाने या निवडणूका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी आवश्यक असलेली प्रभाग रचना, प्रभागांचे आरक्षण सोडत करण्यात येत आहेत. त्यानुसार सोमवारी जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब, भूम, परंडा, नळदुर्ग, मुरूम आणि उमरगा या आठ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागाची आरक्षण सोडत होणार आहे. त्याचे जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांमार्फत नियोजन करण्यात आले आहेत.

१२ वाजता तहसील कार्यालयातील सभागृहात याची सोडत होणार आहे. यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांसह संबंधीत अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या सोडतीनंतर महिलांना अधिक मोठ्या प्रमाणात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे. नव्याने करण्यात आलेल्या प्रभागाच्या फेररचनेमुळे अधिक महिला नगर पालिकेच्या सभागृहात आपले स्थान निश्चित करणार आहे. जिल्ह्यात शंभरी जवळपास महिला नगरसेविका भविष्यात असणार आहेत.

जि.प., पंचायत समितीतही वाढली संख्या
महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण आहेत. त्यानुसार गेल्यावेळी जिल्हा परिषदेच्या एकूण ५५ पैकी २८ महिला सदस्या होत्या. यावेळी ६१ झाली आहे. त्यामुळे महिलांसाठी ३१ महिलांना संधी मिळणार आहे. अशीच जास्तीची सदस्य संख्या पंचायत समिती गणातही मिळणार आहे.

प्रत्यक्षात ८६ नगरसेविकांचे आरक्षण
गेल्यावेळी जिल्ह्यात आरक्षणानुसार ८६ नगरसेविकांना संधी होती. मात्र, परंडा नगर परिषदेत सर्वसाधारण जागेवर दोन महिला निवडून आल्या होत्या. त्यामुळे ही संख्या ८८ इतकी झाली आहे. आता तेथे दहा महिलांना थेट संधी असेल. पुन्हा सर्वसाधारण गटातून काही महिला निवडून आल्यास ही संख्या आणखी वाढेल.

बातम्या आणखी आहेत...