आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी कोरेगाववाडी येथील औषधनिर्माणशास्त्र पदवी द्वितीय वर्ष व पदविका द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी शनिवारी (११) औद्यागिक क्षेत्र भेट घेतली. उमरगा जकेकुर-चौरस्ता येथील औद्यागिक वसाहतीतील एस एच के केमटेक इंडस्ट्रीज व कर्ण ऑक्सिजन प्लांट येथे भेट देवून विद्यार्थ्यांना विविध औद्यागिक केंद्रांना लागणारे साहित्य, औद्यागिक क्षेत्रातील कच्चा माल अन पक्का माल ट्रान्सपोर्ट, ठोक विक्री,किरकोळ विक्री आदी बाबत सखोल माहिती घेवून प्रत्यक्षपणे पाहावयास मिळाली. तसेच उद्योग उभारण्यासाठी लागणारी साधनसामुग्री, आर्थिक नियोजन याबद्दल अधिक माहिती देण्यात आली.
या भेटी दरम्यान अनेक औद्योगिक कंपन्यातील वेगवेगळ्या उत्पादनांसाठी चालणाऱ्या कार्यप्रणाली अगदी जवळून निरीक्षण केल्याने विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपकरणाचे तसेच कार्याची माहिती घेता आली. औद्योगिक परिसरात मशीन टुल्स, वेगवेगळ्या साईजच्या स्प्रिंगचे उत्पादन होते. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विभागांची व प्रोसेस जसे हिट ट्रिटमेंट, क्वॉलिटी चेकिंग, पॅकेजिंग व इतर बाबींची माहिती घेतली.फुड प्रोडक्ट्समध्ये विविध प्रकारच्या साहित्याचे उत्पादन केले जाते. यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रोसेसची सुरुवात व त्याचे पूर्ण प्रोडक्ट्समध्ये रुपांतर या बाबींचा अभ्यास व निरीक्षण केले. कोल्डस्टोरेज शीतगृहाच्या कार्यप्रणाली अभ्यास करतांना रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंग च्या प्रात्याक्षिकासह माहिती विद्यार्थ्यांनी घेतली.
माहिती जाणून घेतली
कॉलेज ऑफ फार्मसी औषधनिर्माणशास्त्र पदवीका प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी शहरातील आरोग्यनगर येथील मेडिकल एजन्सीला भेट देत विविध रोगावर औषधी गोळ्या, पेय, शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य, विविध उपचारासाठी लागणारी उपकरणे आदी बाबतची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. औषधांची ठराविक जागा, त्यात विशिष्ट तापमानामध्ये ठेवण्यात येणारी औषधे, औषधांची विक्री, पॅकिंग, वाहतुक याविषयी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. प्राचार्य महेश कदारे,प्रा अजय बेडदुर्गे यांच्यासह मंगेश भोकरे, प्रा.वैष्णवी फुगटे, प्रा. प्राजक्ता ननावरे, प्रा. प्रिया धोंडगे, प्रदीप जाधव यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.