आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास; मेहुणीसोबत विवाहाचा पतीचा हट्ट, पत्नीची विष घेऊन आत्महत्या

उस्मानाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतीने पत्नीच्या बहिणीसोबतच विवाह करण्याचा हट्ट केला. यासाठी ही दिला. याला त्याच्या नातेवाईकांनीही साथ दिली. यामुळे कंटाळून पत्नीने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. हा प्रकार रविवारी घडला.वंजारवाडी (ता. भूम) येथील श्रीमती पल्लवी सोमनाथ काळे (३०) यांनी वंजारवाडी येथे विष प्राशन करुन आत्महत्या केली. पती सोमनाथ काळे पत्नी पल्लवी यांच्याकडे त्यांच्याच लहान बहिणीसोबत विवाह लावून देण्यासाठी तगादा लावत होता. लवकर विवाह लावून देत नसल्यामुळे पल्लवी यांचा सोमनाथने शारीरिक व मानसिक छळ सुरू केला.

त्याला यामध्ये जगुरास काळे, सुशीला काळे, बबलु काळे, पप्पु काळे, इंदुबाई काळे (सर्व रा. वंजारवाडी, ता. भुम) यांनीही साथ दिली. काही महिन्यांपासून छळ सुरू असल्यामुळे पल्लवी यांना त्रास असह्य झाला. यामुळै त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. पल्लवी यांचा भाऊ सुंदर राजेंद्र शिंदे (रा. बोरगाव, बु. ता. केज, जि. बीड) यांनी दिलेल्या जबाबावरून भूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...