आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुनर्वसन:भौतिक गरजा विद्यार्थ्यांना मोफत; कोरोना काळात अनाथ झालेल्यांचे भारतीय जैन संघटना करणार पुनर्वसन

उस्मानाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात आई किंवा वडिलांचे तसेच दोघांचेही छत्र हरवलेल्या मुला, मुलींचे शैक्षणिक पुनर्वसन करण्यासाठी भारतीय जैन संघटना दत्तक घेणार आहे. याची नाव नोंदणी सुरू असून पुणे येथील वाघोली प्रकल्पात शिक्षणासह सर्वप्रकारच्या भौतिक गरजा विद्यार्थ्यांना मोफत पुरवण्यात येणार आहेत. कोविडमुळे अनाथ झालेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्याचा निर्णय भारतीय जैन संघटनेने घेतला आहे.

विद्यार्थ्यांचा इयत्ता १२ वीपर्यंतचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च संघटनेकडून केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना आई किंवा वडील तर काही जणांना दोघांनाही गमवावे लागले आहे. त्यामुळे शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.अशा इयत्ता पाचवी ते सातवी वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संघटनेच्या वाघोली (पुणे) येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातील वसतिगृहात व्यवस्था केली जाणार आहे. कुटुंबातील एक किंवा दोन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. जिल्ह्यातील इच्छुकांनी संघटनेचे अॅड. शांतीलाल कोचेटा, कंचनमाला संगवे, अॅड. रोहन कोचेटा, पत्रकार उपेंद्र कटके यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिशा समितीच्या बैठकीत समितीच्या सदस्या संगवे यांनी याची माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...