आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थांना चित्रकलेचे ज्ञान आत्मसात व्हावे, या उद्देशाने प्रजासत्ताक दिनानिमित्त १ फेब्रुवारी रोजी सोनेगाव येथील जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत व युवकांनी पुढाकार घेऊन आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेस विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रातील उत्कृष्ट चित्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पोस्टद्वारे पाठवण्यात आले. दरम्यान उत्कृष्ट चित्र काढलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण केले.
यासाठी युवक विकास कांबळे, सरपंच व शिक्षकांनी पुढाकार घेतला. आयोजित चित्रकला स्पर्धेत उत्कृष्ट चित्र काढलेल्या विद्यार्थ्यात इयत्ता ६ वीतील राजश्री शिवाजी मोरे प्रथम, सपना हनुमंत गोफणे द्वितीय, कल्याणी शिवाजी शिंगाडे तृतीय, ७ वीतील प्रांजली नेताजी गोफणे प्रथम, शिवांजली सुनील मुंडे द्वितीय, पवन सतीश चांदणे तृतीय, ८ वीतील दिव्या शरद मोरे प्रथम, रामराजे सतीश पाटोळे द्वितीय, ऋतुजा सिद्धेश्वर चांदणे तृतीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेत ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक एस. पी. पवार, वर्ग शिक्षक व्ही. बी. शिंदे, बी. एल. खूने, जी. एम. सोनवणे, पी. ए. बनसोडे, पी. व्ही. तनमोर, एस. बी. अनपट, यु. एस. टेकाळे, आर. जी. शिंदे आदींचे सहकार्य लाभले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.