आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील बेंबळी कॉर्नर ते बेंबळी ते उजनी या १०४ कोटी खर्चून तयार करण्यात येत असलेल्या रस्त्याचे ४ वर्षांपूर्वी काम सुरू झाल्यापासून वाहनधारकांना होणाऱ्या यातना आताही थांबण्यास तयार नाहीत. एकीकडे खडीचे ढिग तर दुसरीकडे अस्ताव्यस्तपणे विखुरलेली खडी, अशा परिस्थितीत मार्ग काढत वाहने चालवावी लागत आहे. दुचाकीस्वारांचे अपघात होत असून सहा जणांना जीवही गमवावा लागला आहे.
बेंबळी मार्ग उजनीपर्यंतच्या कामासाठी हायब्रीड अॅन्युटींतर्गत १०४ कोटी निधी मंजूर झाला होता. यातून चार वर्षांपूर्वी कामाला सुरुवात झाली होती. मात्र, अनेक अडथळे आल्यामुळे हे काम अजूनही पूर्ण झाले नाही. काम मंजूर झाल्यापासून आनंदात असलेले वाहनधारक आता वैतागले आहेत. नव्या रस्त्याच्या कामापेक्षा पूर्वीचाच एकेरी रस्ता चांगला होता, असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. आता कामासाठी काही ठिकाणी खडी आणून टाकण्यात आली आहे.
परंतु, एकीकडे खडीचा ढिग तर दुसरीकडे पूर्वी दबाई न केलेली विखुरलेली खडी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे येथून प्रवास करणे घातक ठरत आहे. गेल्या चार वर्षात येथे सहा जणांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. यामुळे रस्त्याचे काम योग्य नियोजनाने व वेगात करण्याची गरज निर्माण झाली आहे. तयार रस्ता खराब: बेंबळी ते मेडसिंगा पाटीपर्यंत कसाबसा एका मोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. काही ठिकाणी रस्ता पुन्हा उकरण्यात आला आहे. एकेरी बाजूने रस्ता तयार करण्यात येत असतानाही विशेष काळजी घेण्यात आलेली नाही. मध्येच काम सोडून देऊन डांबरीकरण करण्यात आले आहे. बेंबळीच्या जवळ तीन तर उस्मानाबादच्या जवळ आठ किलोमीटरपर्यंत धक्के खातच प्रवास करावा लागतो.
यंत्रणा सज्ज, वेगाने काम करण्याचे नियोजन
विखुरलेली खडी रोलरने दाबून घेण्यात येत आहे. वेगाने काम करण्यावर आमचा भर असून येत्या १५ तारखेपर्यंत बेंबळी कॉर्नरपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे नियोजन आहे. त्या दृष्टीने सर्व यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे.
अमित बिराजदार, प्रकल्प व्यवस्थापक,
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.