आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआगामी शारदीय नवरात्र महोत्सवात करायचे कामे निश्चित करा. यात्रा कामांची प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, निविदा काढणे आदी कामे नगर पालिकेच्या निवडणुकीचा बिगून वाजण्यापूर्वीच करण्याची सुचना मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी दिल्या आहेत. नातू यांची पहिलीच यात्रा असल्याने जबाबदारी वाढणार आहे. ऐनवेळी होणारी धावपळही यातून वाचणार आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव होणार आहे. या महोत्सवाच्या नियोजनाच्या तयारीसाठी गुरुवारी पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्याधिकारी नातू यांनी नियोजन करण्याच्या सुचना केल्या. यावेळी कार्यालयीन अधीक्षक वैभव पाठक, अभियंता सुशील सोनकांबळे, लेखापाल कृष्णा काळे, अंतर्गत लेखा परीक्षक राहूल मिटकरी, शिवरत्न आतकरे, वैभव अंधारे आदींची उपस्थिती होती. दुपारी ०४ ते ०६ अशी तब्बल दोन तास चाललेल्या बैठकीत यात्रा कालावधीत करावयाचा कामांची चर्चा करण्यात आली. यावेळी पालिका पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपला असल्याने यात्रा नियोजनाचा भार प्रशासकांवर असणार आहे.
आचारसंहितेच्या भीतीने ४ महिन्यापूर्वीच नियोजन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नगर पालिकेचा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात्रा कामांचा प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता तसेच निविदा प्रक्रिया आचार संहितेच्या कचाट्यात अडकू नये या साठी प्रशासनाची घाई सुरू असून तब्बल ०४ महिन्यापूर्वीच नवरात्र महोत्सवाची तयारी आहे.
२०२१ चे २.५ कोटी रुपये यात्रा अनुदान वितरित ऑक्टोबर २०२१ मध्ये पार पडलेल्या नवरात्र महोत्सवा साठी राज्य सरकारने २ कोटी ५० लाख २५ हजार रुपये यात्रा अनुदान पालिकेला वितरित केले आहे. तर २०१९ सालचे यात्रा अनुदान येणे बाकी असल्याचे समजते. कोरोना महा मारीत २०२० साली यात्रा रद्द झाली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.