आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:दक्षिण जेवळी बाजार मैदानामध्ये वृक्षारोपण

लोहाराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या काळात ऑक्सिजनची किंमत सर्वांना समजली असून त्याच्या निर्मितीसाठी वृक्षारोपण केलेल्या प्रत्येक रोपांचे संगोपन करण्यासाठी संपूर्ण गावानी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांनी जेवळी येथील कार्यक्रमात केले.

तालुक्यातील दक्षिण जेवळी येथे शुक्रवारी (दि. २) म्हाडाच्या वतीने बाजारपेठ मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच चंद्रकांत साखरे होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, कार्यकारी अभियंता ऋषीकेश व्यापारी, तहसीलदार संतोष रूईकर, गटविकास अधिकारी शितल खिंडे, म्हाडाचे उपअभियंता सुनिल देशपांडे, सुधाकर बायगव्हाणकर, शाखा अभियंता मोमिन, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवराज चिनगुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी मंडळ अधिकारी स्वामी, तलाठी हणमंत जमादार, ग्रामसेवक एम. के. बनशेट्टी, ग्रामपंचायत सदस्य विवेकानंद बिराजदार, प्रविण बोंदाडे, मनिषा कारभारी, अंबिका भुसाप्पा, सुषमा चव्हाण, गावातील नागरिक हणमंतप्पा भुसाप्पा, मल्लिनाथ साखरे, संभाजी कारभारी, विरभद्र स्वामी, राजू होनाजे, संजय देसाई उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...