आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दहा दिवसांत 10 हजार वृक्ष लागवड, उस्मानाबाद पोलिस दलाकडून 1 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

उस्मानाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद पोलिस दलाने या वर्षी वृक्ष लागवडीचे व्यापक प्रमाणात नियोजन केले आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून सर्वच १८ पोलिस ठाण्यांसह उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात येत आहे. केवळ १० दिवसांतच १० हजार झाडे लावण्यात आली आहेत.

गाव स्तरावरील गायरान जागा, मंदिर परिसरासह पुरातत्त्व विभागाकडून परवानगी मिळाल्यास नळदुर्ग-परंडा किल्ला, तेरसह वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे १ लाख झाडांचे नियोजन आ‍हे. पोलिस विभागाने यावर्षी प्रथमच पोलिसांच्या जागेव्यतिरिक्त अन्यत्र मोकळ्या जागेत झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पोलिस दलाच्या फंडातून खर्च करण्यात येत आहे. या वृक्ष लागवड मोहिमेत वेगवेगळ्या शाळांसह संस्था, संघटनाही सहभागी होत आहेत. खड्डे खोदण्यासह वृक्ष लागवडीसाठी पोलिस कर्मचारी योगदान देत आहेत. फळांसह फुलांची रोपे लावली : पोलिस अधीक्षक कुलकर्णी पर्यावरणप्रेमी मानले जातात. त्यांनी वन विभागाकडील जंगली झाडे न लावता पर्यावरणपूरक तसेच आंबा, बदाम, सीताफळ आदींसह पारिजातक, बांबू, करंज, रेन ट्री आदी झाडांची निवड केली आहे. उस्मानाबादेतील पोलिस ग्राउंडवर टप्प्याटप्प्याने वृक्ष लागवड सुरू आहे. या परिसरात सुमारे २ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. तसेच महामार्गालगतही झाडे लावण्यात येत आहेत.

बातम्या आणखी आहेत...