आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:येडेश्वरी मंदिर परिसरात मान्यवरांकडून वृक्षारोपण

येरमाळा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्रकार संघ येरमाळा व पोलिस ठाणे येरमाळा यांच्याकडून येथील येडेश्वरी देवी मंदिर परिसरामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी एम.रमेश व पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रसेन देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. आज दि.७ रोजी कळंब तालुक्यातील येरमाळा येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त येरमाळा पत्रकार संघ व पोलिस ठाणे येरमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने येडेश्वरी मंदीर मार्ग,मंदीर परिसर मध्ये २५१ वृक्षाची लागवड करण्यात आली.

यामध्ये चिंच, वड,पिपळ,आवळा,शिताफळ,लिंब,करंजी,आदी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.पर्यावरणासाठी हे उपयुक्त आहे. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी एम.रमेश,सपोनि दिनकर गोरे,येरमाळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन बारकुल, दिपक बारकुल, दत्ता बारकुल, मिलिंद देशमुख, सुखदेव गायके, दत्ता गायके, मनोज बारकुल, सुधिर लोमटे, सचीन पाटील, प्रमोद पाटील,यांच्यासह विद्यानिकेतन विद्यालयाचे सचीन पाटील, समाधान बाराते, व शाळेचे विद्यार्थी, कर्मचारी,पोलिस कर्मचारी,उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय कर्मचारी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...