आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळाडूंना अडचण:खो-खोचे इनडोअर सामने खेळवणे ठरले फायदेशीर, मॅटवर संशोधन होणे आवश्यक

उस्मानाबाद / उपेंद्र कटके10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खो खोच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये उस्मानाबादमध्ये प्रथमच इनडोअर सामने खेळवण्याचा प्रयोग करण्यात आला. इनडोअर सामने खेळवणे फायदेशिर ठरले असले तरी तेथे वापरण्यात येणाऱ्या मॅटमध्ये संशोधन होण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. गावागावातील खेळाडू सराव मातीवर करतात सामने मॅटवर खेळत असताना त्यांना अडचणी येऊ शकते. यामुळे आता गावाच्या मैदानातही मॅट उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

उस्मानाबादमध्ये प्रथम खो खोची राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा खेळवली जात आहे. याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये पुरूष ३३ व महिलांचे ३२ संघ सहभागी झाले आहेत. विविध राज्यातील संघांचा यामध्ये सहभाग आहे. अशा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रथमच इनडोअर मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावर ३२ सामने खेळवण्यात आले आहेत. इनडोअर सामन्यांचा प्रयोग यशस्वी झाला आहे. परंतु, मॅटबाबत काही तक्रारी आहेत. येथे कराटे व अन्य खेळासाठी वापरण्यात येणारीच मॅट वापरण्यात आली आहे.

काहींशी मऊसर असलेल्या या मॅटमुळे पळताना खेळाडंूचे पाय रुतत असल्याने तसेच डाय घेत असताना अडचणी आल्याचे सांगण्यात आहे. यामुळे खो खोसाठी इनडोअर हॉलमध्ये मॅट वापरण्यासाठी संशोधन करण्याची गरज खेळाडूंनी व्यक्त केली. मॅटवर खेळाडूंना १०० टक्के कसब दाखवता आले नाही. खेळण्यासाठी वेगच घेता येत नव्हता. मॅटची जाडी अधिक आहे. यामुळे गुडघ्यावर तान येत होता. खेळाडूंना डाय घेण्यासाठीही अडचणी आल्या. इनडोअर सामने घेण्यासाठी केलेला प्रयत्न यशस्वी ठरला तरी मॅटमुळे काही खेळाडू नाराजी व्यक्त करत होते.

सराव मातीवर, सामने मॅटवर गाव पातळीवर तसेच अन्य कोणत्याही ठिकाणी खेळाडू शक्यतो मातीवर खो खोचा सराव करत असतात. आताही अनेक ठिकाणी मातीची मैदाने आहेत. तसेच शालेय व अन्य स्पर्धाही मातीवरच खेळवण्यात येत असतात. मात्र, राज्य व राष्ट्रीय स्पर्धांसाठी अचानक मॅटचा व इनडोअरचा वापर केल्यावर ग्रामीण खेळाडूंना अडचणी येऊ शकतात. यामुळे गाव पातळीवर मॅट पोहोचवण्याची योजना आणणे गरजेचे आहे.

इनडोअरचा फायदा काही राज्यांमध्ये राष्ट्रीय खो खो सामने भरवण्यात आल्यानंतर पावसाने विस्कळीतपणा आला होता. यामुळे इनडोअर प्रकाराचे मैदानाची गरज तेथे प्रकर्षाने जाणवली होती. काही राज्यात बर्फ पडतो. काही ठिकाणी जीवघेणे उन असते. सकाळी नऊ पासूनच उन्हामुळे उष्णता निर्माण होत असते. अशा वेळी इनडोअर सामन्यांचा हॉल गरजेचा असतो. उस्मानाबादमध्ये पाऊस किंवा अधिक उन जाणवले नाही.

बातम्या आणखी आहेत...